काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींच्या चौकशी विरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०७/२०२२
सद्यस्थितीत भारतीय जनता पक्ष व केंद्र सरकारने ईडी चार गैरवापर करुन राजकारणातील विरोधकांना संपवण्यासाठी व सुड उगारण्यासाठी षडयंत्र रचले असल्याचे आरोप गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत असून नुकतेच
राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनिया गांधीं यांची आज नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दुसऱ्यांदा ईडीची चौकशी करण्यात येत आहे, त्या विरोधात काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यात ठिय्या आंदयोलन करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ आज पाचोरा येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
पाचोरा काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तहसिल कार्यालया समोर मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. विविध घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहराध्यक्ष शरिफ शेख, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, कुसुम पाटील, सुनिता पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद मौलाना, शिवराम पाटील, सय्यद ईसुफ टकारी, बिस्मिल्ला टकारी, शंकर सोनवणे, ललित पुजारी, जलील शहा, कल्पेश येवले, राहुल शिंदे आदींनी धरणे आंदोलन मध्ये उपस्थित होते.