पिंपळगाव हरेश्वर येथील अरुण नगरमध्ये नळांना अशुद्ध पाणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील अरुण नगर येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना मागील काही दिवसापासून अशुद्ध पाणी येत असल्याने या परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबतीत या परिसरातील रहिवाश्यांनी दिलेली माहिती अशी कि अरुण नगर वार्ड क्रमांक दोन या परिसरात ग्रामपंचायतीतर्फे पुरवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या नळांना मागील काही दिवसापासून दुषीत पाणी येत असल्याने या परिसरातील जनतेला पिण्यासाठी शुध्द पाणी मिळत नसल्याने आसपासच्या परिसरातून पाणी आणावे लागत आहे.
कारण नळांना येणारे पाणी पिण्यासाठी योग्य नसून या अशुद्ध पाण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागेल म्हणून शुध्द पाण्याचे जार घेण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. या बाबतीत या वार्डातील ग्रामपंचायतीचे सदस्य यांना हि बाब सांगितली असता समाधानकारक उत्तर मिळत नसून याच गावात सर्वदूर पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या नळांना शुध्द पाणी येते मात्र अरुण नगर वार्ड क्रमांक दोनमध्येच अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येते.
म्हणून पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन कुठेतरी फुटली असावी व त्यात सांडपाणी जाऊन ते नळांना येत असावे असा संशय व्यक्त केला जात असून ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देऊन अरुण नगर वार्ड क्रमांक दोन मधील रहिवाशांना शुध्द पुरवठा पाणी करण्यात यावा अशी मागणी होत असून नळांना शुद्ध पाणी पुरवठा न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
(पिंपळगाव हरेश्वर येथील अरुण नगर परिसरात नळांना आलेल्या दुषीत पाण्याचे छायाचित्र तेथील ग्रामस्थांनी सत्यजित न्यूज कडे पाठवले आहेत. ते छायाचित्र सोबत आहे.)