गणेश भोसले व प्रल्हाद भोसले यांचे वाडी गावावर दडपण, श्रीराम मंदिराच्या नियोजित जागेवर केले अतिक्रमण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२२
पाचोरा तालुक्यातील वाडी हे गाव वाडी, शेवाळे नावाने ओळखले जाते. या गावात सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने राहतात. या गावत शेतकरी व मजूर वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नित्यनेमाने कांदा, भाकरी घेऊन कामाला जाणारांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने जो, तो आपापल्या उद्योगात मग्न असतो. परंतु याच गावात प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश प्रल्हाद भोसले हे दोघ बाप, लेक कुटुंबासह राहतात. नशिबाने म्हणा कि लबाडीने म्हणा परंतु यांच्यावर लक्ष्मी प्रसंन्न असल्यामुळे आपले कुणाशीही काही देणेघेणे नाही अशी वागणूक आहे.
अश्या श्रीमंतीच्या गुर्मीत जगतांना गावात वावरतांना खिशात पैसा व अंगावर चरबी असल्याकारणाने धक्क्याला बुक्का अशी माणूसकी शुन्य वागणूक छोट्या, छोट्या गोष्टीवरून हमरीतुमरीवर येणे मारामारीला तयार म्हणून कि काय याच गावातील लोकांनी नहाकच उपदव्याप नको म्हणून या दोघांकडे केलेले दुर्लक्ष व यातूनच प्रल्हाद व गणेशचा मनोमनी झालेला गैरसमज यातुनच या दोघांची हिंमत वाढत गेली व या बाप लेकांनी वाडी गावातीलच परिस्थीतीने व स्वभावाने अत्यंत गरीब, मनमिळाऊ स्वभाव, गावातील सार्वजनिक, धार्मिक कामात हातभार लावणारा, दुसऱ्याच्या सुखदुःखाची जाणीव ठेवून धाऊन जाणारा पुनमचंद भावराव भोसले वय अंदाजे (४०) वर्षे नात्याने पुतण्या असलेल्या तरुणाला शेतात बैल घुसल्याच्या शुल्लक कारणावरून लाकडी दंडुक्याने मारहाण केली याच मारहाणीत पुनचंद भोसले याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाडी गावात माहीत पडताच सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत संतप्त भावना व्यक्त करत पुनमचंद भोसले याच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करुन कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
या घटनेचे वृतांकन करण्यासाठी वाडी गावाला भेट दिली असता प्रल्हाद मोतीराम भोसले याचे बरेचसे लफडे लोका कथन करत याने गावाच्या मालकीच्या राम मंदिरासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर हुकुमशाही पध्दतीने अतिक्रमण करुन त्याठिकाणी पक्के घर बांधले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी करत या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.
तसेच या राम मंदिराच्या जागेवरचे अतिक्रमण काढण्यासाठी मागील काळात ग्रामपंचायतीने तक्रार केली होती याची दखल घेऊन पाचोरा तालुक्याचे मा. तहसीलदार साहेब यांनी दिनांक २३ फेब्रुवारी २००१ मध्ये ग्रामपंचायतीला पत्र पाठवून वाडी येथील शेतजमीन गट क्रमांक १३२ क्षेत्र ०/८५ आर या जागेवरील होणारे बांधकाम त्वरित थांबवावे व हे अतिक्रमण ग्रामपंचायतीने स्वखर्चाने काढून टाकावे असा लेखी आदेश देत ग्रामपंचायतीने दिलेला ठराव रद्दबातल ठरवला होता. कारण गावठाणातील जागा किंवा ग्रामपंचायत निहीत जागा वाटप करण्याचा कोणताही हक्क किंवा अधिकार नसल्याचे नमूद केले होते.
परंतु प्रल्हाद भोसले व गणेश भोसले हे भांडखोर व आडदांड वृत्तीचे असल्याने मा. तहसीलदार साहेब यांनी सन २००१ मध्ये दिलेल्या आदेशानुसार अतिक्रमण काढण्यात न आल्यामुळे आज २०२१ साल उजाडले तरीही म्हणजे तब्बल विस वर्षें उलटून गेली तरी कोणीही हे अतिक्रमण काढण्यासाठी पुढे आले नसल्याने ते अतिक्रमण जैसे थे आहे. यामुळे राम मंदिर उभारणीच्या कामाला अडथळा निर्माण झाला असल्याने गावातील रामभक्त संतप्त झाले असून त्यातच या अतिक्रमण धारकांनी गावातीलच पुनमचंद भोसले याचा दिवसाढवळ्या खुन केल्याने या भोसले कुटुंबाने राम मंदिरासाठी आरक्षित असलेल्या जागेवरचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अशी मागणी वाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच येत्या एक महिन्याच्या आत हे अतिक्रमण न निघाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत भविष्यात घडणाऱ्या घटनांना ग्रामपंचायत, तहसीलदार हे जबाबदार रहातील असे सुचित केले आहे.