बांबरुड (राणीचे) येथे विजेच्या धक्क्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू, सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४-२०२१
विजेच्या तारा तुटून पडल्याने विजेचा जोरदार करंट लागुन पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील राजाराम भिल्ल यांच्या ३५ (शेळ्या) बकरींचा जागेच मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी की बांबरुड (राणीचे) येथील राजाराम भिल्ल हे शेळीपालन व्यवसाय करतात तसेच इतर लोकांच्या शेळ्या चारून आपला उदरनिर्वाह भागवतात. स्वमालकीच्या व इतर गोरगरीबांच्या अश्या एकूण १५० चे जवळपास शेळ्या असल्याने त्यांनी त्या शेळ्या गावाजवळील जुन्ने शिवारातील रविंद्र देशमुख यांच्या शेतात पाडाव बनवून ठेवल्या होत्या तसेच या शेळ्यांचा जंगली श्वापदापसून बचाव व्हावा म्हणून तारेचे कुंपण केलेले आहे.
ज्याठिकाणी या शेळ्यांचा वाडा बसवलेला होता त्याच्या जवळूनच विद्यूतपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्यूतवाहिनीच्या तारा गेलेल्या असल्याने दिनांक १२ सोमवाररोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुख्य विद्यूतवाहीनीच्या तार तुटून नेमक्या या शेळ्या बाधलेल्या जागी पडल्याने विजेचा धक्का लागताच काही शेळ्या तडफडून वाचण्यासाठी किंचाळत होत्या हे आकस्मिक आलेले संकटात शेळ्यांच्या गोंगाटामुळे इतरही शेळ्या घाबरून सैरावैरा पळु लागल्या मात्र शेळ्यांच्या सुरक्षिततेसाठी बनवललेल्या तारेच्या कंपाऊंड मुळे त्यांना बाहेर निघता आले नाही.
उलट या तारेच्या कंपाऊंडला विद्यूत तारांचा स्पर्श झाला असल्याने बाहेर निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेळ्यांनाही विजेचे करंट लागून त्या मृत झाल्या. ज्या विद्यूतवाहिनीच्या तारा तुटून पडल्या होत्या ती विद्यूतवाहीनी मुख्य असल्याने जास्त होल्टेज मुळे शेळ्यांची जागेवरच राख झाली मदत करणेही शक्य झाले नाही.
कोरोनाचा सामना करत करत जंगलात राहून आपल्या कुटंबाचा कसाबसा गाडा ओढणारा राजाराम भिल्ल हा या घटनेमुळे हवालदिल झाला असून तो समोरचे दृश्य पाहून धायकोलमडून छाती ठोकून आक्रोश करतांना आलेले संकट असाह्य झाल्याने जागेवरच बेशुद्ध होऊन पडला होता. अशी माहिती समोर येत असून
(या कुटुंबाला सावरण्यासाठी रितसर पंचनामा होऊन अपघात दाखल करुन घेत अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी होत आहे.)