सोयगाव तालुक्यात सट्टा मटका जोरात.

प्रज्वल चव्हाण (गोंदेगाव ता.सोयगाव वार्ताहर )
दिनांक~१२/०४/२०२१
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे सट्टाबेटींगचा व्यवसाय जोरात सुरू झाले आहे. लोकांची अवस्था एवढि बिकट झाली आहे की लोकांना क्लोज झोपू देईना व ओपन उठू देईना अशी अवस्था झाली आहे. गोंदेगाव मध्ये पाच ते सहा मटका चालक आहेत. त्यांचा सर्रास दुकाने चालू आहेत. कोणाचीच भीती न बाळगता सर्रासपणे चालू आहेत. त्यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी मटका व्यवसाय काहीसा कमी झाला होता. मात्र तो पुन्हा जोमाने सुरू झाला आहे .
यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारे गेल्याचे चित्र आहे.या वाढलेल्या अवैध धंद्याच्या पैशातूनच खेड्यात हाणामारीचे प्रकार वाढले असून भुरट्याचोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून लॉकडाऊच्या कालावधीत हाताल काम नसल्याने व घरधनी कामधंदा न करता सट्टाबेटींगच्या नादी लागल्याने महिलांना संसाराचा गाड ओढणे मुश्कील झाले असून सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कायमस्वरूपी हे अवैधधंदे बद करण्यासाठी गावातील तरुण व महिलावर्ग पोलीस अधीक्षकांना भेटणार असल्याची चर्चा आहे.