सिल्लोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या गुडघ्याला बाशिंग .
कादिर पटेल (सिल्लोड तालुका प्रतिनिधी)
दिनांक~२६/१२/२०२०
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची धावपळ सूरू झाली असून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात सगळेच व्यस्त दिसून येत असून नवनवीन चेहेरे सक्रिय होत आहेत.
आजपासुन होणार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सर्वच पक्ष आपल्याला पध्दतीने निवडणूकीच्या रणांगणावर उतरले असल्याने सर्वच पक्षाची खलबते व मोर्चे बांधणीसाठी जयत्त तयारी सुरु आहे.
सिल्लोड तालुक्यातील सध्या ग्रामपंचायतीच्या- निवडणुकीचाा कार्यक्रम जाहीर झाला आहेत, त्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज दिनांक २३ ) पासून सूरूवात होणार असल्याने यासाठी लागणार्य् कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यासाठी इच्छुक उमेवाराची बरिच धावपळ सूरू आहे. मात्र हे करताना उमेवाराची बरिच दमछाक होत आहेत, राज्य निवडणुक आयोगाने गेल्या आठ महिन्यापासून मूदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर के ल्याने इच्छुकाची तारांबळ उडाली आहे. यंदा ऑनलाईन आणि ऑफलाईन उमेदवारी अर्ज सादर करतांना आरक्षित जागांवर लढत देणार्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. नामनिर्देशन अर्जातील कागदपत्रांची यादी मोठी आहे. निवडणुकीचा खर्चासाठी राष्टीयीकूत बॅकेचे खाते बंधन कारक आहे आहे. मागार्स व इतर प्रवर्गात निवडणुक लडविण्याच्या उमेवारांना तर अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे. तहसिल कार्यालयतील सेंतू केंद्रामध्ये विविध दाखले मिळण्यासाठी गर्दी होणार आहे. आता २३ ते ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची आहेत. त्यातच राखीव जागेवर अर्ज दाखल करण्यासाठी अवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रस्तावासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सूरू झाली आहे. अनेक महिला उमेवारांचे माहेर तालुक्याबाहेर असल्याने प्रमाणापत्र काढण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागत आहे. संरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने उमेदवारांमध्ये गोधळाचे वातावरण आहे _ संरपंच पदाची संधी मिळणार की नाही याबाबत प्रत्येकाला साशंकता आहे खर्या अर्थाने थेट संरपंच आरक्षण निश्चित झालेले नाही, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येणारा सदस्य संरपंच पदासाठी स्पर्धेत असणार आहे, आरक्षण पडल्यानंतर ही स्पर्धा तीव्र होणार आहे मात्र आतापासूनच तयारी केली तरच इच्छुकांना ही संधी मिळणार आहे,
(जात प्रमाणपत्र प्रकिर्या अडचणींची: जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी घरपट्टी व नळपट्टी भरण्यापर्यत सगळी ,प्रक्रिया एकाच वेळी करावी लागणार आहे, शिवाय उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी राष्ट्रीयीकूत बॅंकेमध्ये खाती उघडण्यासाठी मोठी रांग लागल्याचे चित्र पाहाला मिळत आहे, अर्ज केल्यानंतरही वेळेत खाते क्रमांक मिळवण्यासाठी तर अडचणी असतात त्यामुळे खर्चाचा तपशील ठेवण्यासाठी सहकारी किंवा नागरी बॅंकांच्या खात्याचा पर्याय स्वीकारला जावा अशीही मागणी घाटनाद्रा परिसरातल्या. ज्या गावाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या गावाच्या उमेदवारांनी आशी मागणी केली, तसेच घाटनांद्रा गावाच्या निवडनूका लागल्याने संरपंच पदासाठी गूळग्याला बाशीगे बाधून तयारी लागले होते पण आचानक राज्य निवडनूक आयोग्याने आरक्षण राखून ठेवले त्यामुळे यांची उमेवाराची लय फजिती झाली व याचा खर्च कोण करणार आसे गणित चालू आहेत, हे आसे झाले की नवरदेव मंडपात आला आणि नवरी ने लग्नासाठी नाकार दीला,