अंतुर्ली नंबर एक येथील विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी मारून आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नबर एक येथे विवाहित मुलासह आई ची विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची ह्रदय पिळुन टाकणारी घटना घडली आहे.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे काल रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय विवाहित युवकासह त्याच्या आई ने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आत्महत्या चे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मयत युवकाचे नाव नितीन पंढरीनाथ पाटील असुन त्याच्या आई चे नाव प्रतिभा पंढरीनाथ पाटील वय ४५
आहे. दोघा माय लेकाने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही. विहीरीत पट्टी चे पोहणार्यांनी आधी आईचे प्रेत काढले तर मुलाचे प्रेत नंतर गवसले. परीसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघांचे प्रेत शवविच्छेदन साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वडील पंढरीनाथ पाटील सह आजी आणि मयत नितीनची पत्नी पोलीस चौकशी साठी ताब्यात.