डॉ. संतोष पाटील यांनी केली पक्षासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था .

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२१
गोराडखेडा येथील व्याख्याते डॉक्टर संतोष पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. वंदनाताई यांनी आपल्या घर परिसरात ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्या व कुंभार बांधवांनी बनवलेले मातीचे द्रोण बांधून व धान्य ठेऊन पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था केली.
यावर्षी अत्यंत कडक उन्हाळा असल्यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व अन्नधान्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे संतोष पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांनी विभिन्न ठिकाणी रस्त्याने लागणार्या झाडांवरती द्रोण व पाण्याच्या बॉटल बांधून पक्ष्यांसाठी व्यवस्था केली आहे. ते दररोज या ठिकाणी पाणी व धान्य ठेवत असतात.
याबाबत डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले की झाडाझुडुपांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु असून दिवसेंदिवस निसर्ग संपत्ती झपाट्याने नष्ट होत आहे. त्यामुळे पक्षांचा निवारा हिरावला जात आहे. तसेच गावपातळीवरील मातीची घरे कालबाह्य होऊन त्याजागी सिमेंटची घरे आली म्हणून पक्ष्यांच्या निवाऱ्याची कठीण समस्या निर्माण झाली असल्याने प्रत्येकाने आपपल्या घर परिसरातील झाडांवर तसेच योग्य त्या जागेत पक्ष्यांचा निवार व अन्नपाण्याची व्यवस्था करावी अन्यथा पक्षाअभावी निसर्गाचा समतोल बिघडून भविष्यातील पिढीला चित्रातून पक्षांची ओळख करून द्यावी लागेल अशी खंत व्यक्त केली.