पाचोरा शहरात यंदाही कोरोणाच सावट असल्यामुळे बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०७/२०२१
पाचोरा शहरात लॉकडाऊन असल्याने यावर्षीही शासनाचे नियम पाळत ईद साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. या ईद निमित्ताने वेब मीडियाचे सदस्य वेब मिडीया असोसिएशनचे जिल्हा समन्वयक जावीद शेख यांना वेब मीडियायांच्या सर्व पदाधिकारी कडून तसेच पाचोरा शहरातील व्यापारी व समाजबांधवांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
आज खबकरी ईद असून रमजान प्रमाणे या ईदला देखील अत्यंत जल्लोषात साजरी करण्यात येत. बकरी ईदला विशेष नमाज पठण केलं जाते.तसंच बकऱ्याची कुर्बानी देखील दिली जाते. यानंतर आपल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांना खास दावतही (आमंत्रण) दिली जाते.
परंतु यावर्षी बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी केली जात आहे. कारण यावेळेसही गेल्या वर्षीप्रमाणे करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सरकारने बकरी ईद देखील प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केले होते. त्यानुसार पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील मुस्लिम बांधवानी सूचनेचे पालन करून बकरी ईद साजरी केली व कोरोनाचे संकट लवकरात लवकर जाण्यासाठी अल्लाहच्या दरबारात मागणी केली.