एकलव्य संघटनेच्या वतीने पाचोरा पोलीस स्टेशनला दिले निवेदन; आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी.
दिलीप जैन. ( पाचोरा )
मौजे सारंगखेडा ता.शाहदा जि.नंदूरबार येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा खुन करणाऱ्या आरोपीस व बोरखेडा ता.रावेर जि.जळगाव येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खुन करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी या उद्देशाने पाचोरा पोलीस स्टेशन चे निरीक्षक अनिल शिंदे साहेबांना एकलव्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनतर पोलीस स्टेशन समोर घोषणा बाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणाले आदिवासी समाजाच्या मुलींवर या पुढे कोणीही वाईट नजर टाकणार नाही.असे कृत्य करणाऱ्या आरोपीस वचक बसेल.कोणत्याही समाजात असा प्रकार पुढे घडू नये. यासाठी सारंगखेडा व बोरखेडा येथील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.असे सुधाकर वाघ म्हणाले, पोलीस स्टेशन ला निवेदन देते वेळी.जिल्हाअध्यक्ष सुधाकर वाघ, तालुकाध्यक्ष गणेश वाघ, रोहिदास जाधव, गणेश भिल, कैलास सोनवणे, तुषार शिरसाठ,सागर मालचे, रमेश ठाकरे, महेंद्र सोनवणे,बालू ठाकरे,बबन मोरे,श्रावण वाघ,संजू सोनवणे,दगडू नाईक,विकास सोनवणे, शिवदास सोनवणे,
रवी सोनवणे, एकलव्य गर्जना ग्रुप चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.