पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात मोबाईल ग्राहक त्रस्त
दिलीप जैन.(पाचोरा)
सणासुदीच्या कालावधीत व्यवसायीक आपल्याला जास्त ग्राहक मिळवे म्हणून,वेगवेगळ्या सवलतींचे आमिष दाखवून ग्राहकांना आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु यापैकी बऱ्याच जाहिराती व सवलती फसव्या असतात असे लक्षात येते
या फसव्या जाहिराती करण्यात मोबाईल कंपण्याही मागे राहिलेल्या नाहीत असा आरोप मोबाईल ग्राहकांनी सत्यजीत न्यूजला सांगितला
यात सणासुदीच्या कालावधीत मोबाईल कंपन्यांनी अँडीयो व्दारे कमी पैश्याच्या पँकेजमध्ये दररोजच्या वापरासाठी दिड जीबी , दोन जिबी डेटा सोबतच कॉलिंग व रोमिंग फ्री अशी जाहिरात केली.या जाहिरातीला बळी पडत लाखो ग्राहकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी तिन तिन महिन्याचे पँकेजमध्ये रिचार्ज केला
मात्र
सणासुदीच्या कालावधीत मोबाईल टावर अकार्यक्षम करून मोबाईलवर रेंजमध्ये असल्यावरही फोन न लागणे , नेटवर्क कमी दाखवणे , व्हाट्सएप व व्हिडिओ कॉलिंगमध्ये रेंजमुळे अडथळा येणे तांत्रिकदृष्ट्या मोबाईल टॉवरमध्ये बिघाड निर्माण होणे अश्या बऱ्याच त्रुटी निर्माण करून ग्राहकांच्या खिश्यावर डल्ला मारण्यासाठीची ही आधुनिक पध्दत शोधून ग्राहकांची आर्थीक लूट केली जात असल्याचे मत व्यक्त केले
तरी मोबाईल कंपन्यांच्या या मनमानी कारभारावर कोण लगाम घालेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(महत्त्वाचे) आजतरी शंभरट टक्के जनता मोबाईलवर अवलंबून असते व ऐनवेळेस मोबाईल टॉवर मिळत नसल्याने वैद्यकीय उपचारासाठी कींवा इतर संकटसमयी ,बिकट परिस्थितीत मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते )