पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज एकदिवसीय धरणे आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२३

पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा यासाठी आज उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी सकाळी ११ ते ०४ या वेळात मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शेतकरी सेना, व्यापारी आघाडी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शेतकरीवर्ग, पाचोरा, भडगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या