सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पाचोरा नगरपालिके कडून उल्लंघन ? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ते कोण ?

जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पाचोरा नगरपालिके कडून उल्लंघन ? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ते कोण ?

By Satyajeet News
March 29, 2021
1915
0
Share:
Post Views: 173
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२१

राज्यभरात वाढलेल्या कोविड फैलावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.दररोज रुग्णसंख्या नवीन उच्चाक गाठत असल्याने कोणत्याही क्षणी पुन्हा लॉकडाऊन लागण्याचे चिन्ह आहेत. रुग्णसंख्ये सोबतच रुग्ण मृत्य पावण्याचे देखील प्रमाण वाढले आहे.अशा बाधित / संशयित मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून दिले आहेत.

मात्र पाचोरा नगरपालिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचेच उल्लंघन होत असल्याचे चित्र असून मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठीची प्रक्रिया अनधिकृतपणे सुरू असून याबाबत कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नसल्याने संबंधितांकडून मृत रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे.एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्यांचे नातेवाईका कडून अंत्यसंस्काराच्या समानासाठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत तर अशा सर्व मृत व्यक्तींचा अंत्यसंस्काराच्या खर्च हा पुन्हा पालिकेकडून संबंधित तोंडी आदेश देण्यात आलेला ठेकेदार वसूल करणार असल्याने नेमक्या या ठेकेदाराच्या मागे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे कोण ? हे अनुत्तरीत असून याची चौकशी होऊन संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे अवमान प्रकरणी कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार पाचोरा नगरपालिका एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सात हजार रुपये अदा करणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र हा दर निविदा प्रक्रिया पार पडण्याच्या आधीच का व कोणी निश्चित केला हे मात्र आकलनाच्या पलीकडे असून यात मृतांच्या टाळू वरचे लोणी खाण्यात कोण कोण भागीदार आहेत हे जनते समोर येणे गरजेचे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वा प्रांताधिकाऱ्यांनी देखील अशा बेजबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच आमदार किशोर पाटील व नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी देखील या प्रकाराची तातडीने दखल घेत संबंधितांना जाब विचारणे गरजेचे आहे.
तसेच अनेक खाजगी कोविड केअर युनिट मध्ये देखील अशा मृत व्यक्तींच्या बॉडी पॅकिंगचे पाच पाच हजार व साहित्य खरेदीच्या नावाने दोन दोन हजार रुपये नातेवाईकांना मोजावे लागत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच दुसरीकडे कोरोना बाधित किंवा संशयित मृत व्यक्तीचे शव स्मशानभूमी पर्यंत पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका चालक, मालक हे यांचे नातेवाईकांकडून अनधिकृत पणे एक हजार ते पंधराशे रुपये घेतात असे असल्याचे समोर आले आहे. अशा रुग्णवाहिकांवर देखील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

लॉकडाऊन कालावधीत पाचोरा शहरातील काही क्षणचित्रे.

Next Article

सत्यजित न्यूजची दखल घेत पाचोरा नगरपरिषदे कडून ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वप्रकारचे अवैध धंदे बंद करा, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर अहिरे.

    June 23, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पहुर पोलीसांनी आणले बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस.

    May 20, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड व लोहारा परिसरात अवैधधंद्यांचा सुळसुळाट, पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे यांची बदली करा. शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. तानाजी पाटील यांची मागणी.

    May 2, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    गौण खनिज वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या कारवाईत वाळू माफियांचा खोडा घालण्याचा प्रयत्न असफल.

    March 13, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    इलेक्ट्रीक वायर चोरी प्रकरणी भोकरी येथील जाकिर कहाकरला तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी.

    April 27, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्यक्राईम जगतमहाराष्ट्र

    जाहिरात : विकणे आहे …!

    October 7, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगतमाझा सिंधुदुर्ग

    वेताळ बांबर्डे येथील ४६ वर्षीय युवक बेपत्ता ; वडिलांनी दिली पोलीस ठाण्यात फिर्याद

  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान चित्रफितीचे प्रकाशन.

  • धार्मिक

    अंबे वडगाव येथील श्री. पारिमांडल्य महानुभाव आश्रमात सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अवतारात दिन महोत्सवाचे आयोजन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज