नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांच्या आमदार निधीतून, पाचोरा तालुक्यातील विद्यालयांना संगणक भेट
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२२
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.मा.श्री. सुधीरजी तांबे यांनी पाचोरा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाची गरज असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या आमदार निधीतून पाचोरा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यालयांना संगणक संच भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी संगणकीय संच उपलब्ध करून दिले.
यात नवीन उर्दू हायस्कूल पाचोरा, माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी पाचोरा, माध्यमिक विद्यालय खडकदेवळा बुद्रुक, नवजीवन प्राथमिक विद्यालय पाचोरा, श्रीमंत के. एस. पवार. आश्रम शाळा वरसाडे तांडा, भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय तारखेडे, डॉ. जे .जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा, उर्दू माध्यमिक विद्यालय कुऱ्हाड खुर्द, जनता विद्यालय वाडी शेवाळे, वसंतराव नाईक प्राथमिक शाळा वडगाव आंबे, उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज पाचोरा, कळसाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा, इत्यादी विद्यालयांना संगणक संच देण्यात आले.
विद्यालयांना संगणक संच उपलब्ध करून देण्यासाठी ॲड.अंबादास गोसावी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ता युवक काँग्रेस जळगाव व श्री. संजय मासाळ यांनी प्रयत्न केले. संगणक वाटपाचा कार्यक्रम माध्यमिक विद्यालय खडकदेवळा येथे संपन्न झाला. यावेळी ॲड.अंबादास गोसावी यांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालय खडकदेवळाच्या मुख्याध्यापिका सौ.सोनवणे मॅडम, श्री.गरुड सर, वाडी शेवाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुर्यवंशी सर, उर्दू माध्यमिक विद्यालय कुऱ्हाडचे मुख्याध्यापक श्री.विवेकानंद पाटील, न्यू उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पिंजारी सर तसेच वरसाडे तांडा आश्रम शाळाचे मुख्याध्यापक श्री. राठोड सर व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.संदीप पाटील यु.काँ. विधानसभा अध्यक्ष पाचोरा भडगाव श्री.प्रवीण पाटील, श्री.विनोद मुळे, श्री. संदीप मराठे श्री.सुनील पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.