सत्यजित न्यूजची दखल घेत पाचोरा नगरपरिषदे कडून जाहीर खुलासा.
दिलीप जैन(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२१
जनमानसातून मिळालेल्या माहितीच्या आधारे व सोशल मिडियाची दखल घेत सत्यजित न्युज कडून
(जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पाचोरा नगरपालिके कडून उल्लंघन ? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ते कोण ?)
या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित करण्यात आले होते. याची दखल घेत पाचोरा नगरपरिषदे कडून पुढील आवाहन करण्यात आले असून जनतेने याची दखल घ्यावी
पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना जाहिर आवाहन:- डिसेंबर २०२० या महिन्यापावेतो कोरोना चा प्रभाव अतिशय कमी झाल्याने पाचोरा नगर परिषदेकडून कोविड~१९ या महामारीत मृत पावलेल्या रुग्णांचा कोविड~१९ च्या नियमानुसार अंत्यविधी करण्यासाठी नियुक्त केलेल्या संस्थेचे कामकाज बंद होते. सद्यस्थितीत या महामारी मुळे मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढल्याने दिनांक:- ०१/०४/२०२१ पासून पुनश्च नवीन निविदेद्वारे नगर परिषदेकडून काम देण्यात येणार असून. नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होणार नाही.या कामासाठी दरम्यानच्या काळात कोणाचीही बिल प्रदान केलेले नाही व केले जाणार नाही. सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, १ एप्रिल २०२१ पासून. कोविड~१९ मुऴे मृत पावलेल्या पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील कोणत्याही रुग्णाचा अंत्यसंस्कार नियमानुसार पाचोरा नगरपरिषदेने नियुक्त केलेली संस्था करेल. त्यासाठी कोणालाही पैसे मोजावे लागणार नाहीत. कोणीही पैशाची मागणी केल्यास नगर परिषदेकडे तक्रार करावी.
(पाचोरा नगरपरिषद पाचोरा जिल्हा जळगाव)