शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन फिरणारे आता सत्तेत मशगुल (खासदार उन्मेश दादा पाटील) केळी फळ पिक विमा निकष विरोधात जळगाव येथील ९ तारखेच्या आंदोलनाकरीता नगरदेवळा येथे समन्वय बैठक संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी घेरला गेला आहे. एकीकडे शेतीला मुबलक पाणी असताना दुसरीकडे वीज मिळत नाही. शेकडो शेतकऱ्यांना डीपी जळाल्याने आणि साधे ऑईल नाही म्हणून त्रागा होतो आहे. शेतकरी एम एस ई बी कार्यालयात चकरा मारून हैराण आहे. हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका सातत्याने घेत असून काहीही गरज नसताना केळी फळ पिक विम्याचे निकष बदलून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला शिंगाडे मोर्चे काढणारे आता सोंगाडे झाले आहेत. *शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन फिरणारे आता सत्तेत मशगुल* असून शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलन करून सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असून मोठ्या संख्येने ९ तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावे.असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे. आज नगरदेवळा येथील तिळवण तेली समाज मंगल कार्यालयात आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, पाचोरा भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीने नगरदेवळा येथे केळी पीक विमाच्या बाबतीत शासनाने केळी फळ पिक विमा निकषांत केलेले अन्याय कारक बदल केल्याने येत्या दि.९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नियोजन बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे,पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, पाचोरा पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी सभापती तथा पं.स.सदस्य बन्सीलाल पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,भाजपा पिंपळगाव शहराध्यक्ष नामदेव पाटील,मा.सैनिक आघाडी अध्यक्ष भरत जीभु पाटील,शरद पाटील,प्रमोद सोमवंशी,पिंटू भामरे,किशोर पाटील,उमेश काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंद शेलार यांनी सूत्र संचालन तर आभार प्रमोद सोमवंशी यांनी मानले. प्रास्ताविकात पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शेतकरी बांधवांनी एकजुटीने या तीन तिघाडी सरकारच्या विरोधात इल्गार करायचा आहे. पोपट तात्या भोळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले ते म्हणाले सध्याचे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांबाबतीत सातत्याने अन्याय सुरू असून शेतकरी हवालदिल झाला असून केळी फळ पिक विम्याचे निकष बदलून मोठी चूक केली आहे. शेतकरी बांधवांनो आज जागे व्हा आणि राज्य सरकारच्या विरोधात पेटून उठा असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले.