मानमोडी शिवारात मजूर महिलेवर जंगली श्वापदाचा हल्ला, सुदैवाने महिला बचावली. वनविभागाने मदत करावी अशी मागणी.
दिलीय जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव ते वरखेडी दरम्यान असलेल्या खडी खदान परिसरात झोपडी समोर झोपलेल्या मजूर महिलेवर रविवार दिनांक ३० मे रोजी सकाळी अंदाजे ४ वाजेच्या सुमारास जंगली श्वापदाने हल्ला चढवला परंतु महिलेने आरडाओरड केल्यामुळे शेजारी झोपलेले मजूर जागे होऊन एकच गोंगाट केल्याने जंगली श्वापदाने पळ काढला या हल्ल्यात मजूर महिलेचा जिव वाचला असला तरी जबर जखमी झाली असून जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील काही मजूर खडी फोडण्याच्या कामानिमित्त मानमोडी शिवारात आले असून तेथेच झोपड्या बनवून त्यात वास्तव्याला आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हा मजूर वर्ग उघड्यावरच झोपत असतो ३० मे रविवारी रात्री रोजच्या प्रमाणे मजूर बाहेर झोपले असतांनाच सकाळी ४ वाजेच्या सुमारास जंगली श्वापदाने हल्ला चढवत उघड्यावर झोपलेल्या शेवंताबाई सखाराम नवले वय (६५) वर्षे यांच्यावर जंगली श्वापदाने हल्ला चढवला यावेळी शेवंताबाई ओरडल्याने शेजारी झोपलेले मजूर जागे होऊन आरडाओरड केल्याने जंगली प्राण्याने पळ काढला.
या हल्ल्यात शेवंताबाई यांच्या चेहेऱ्यावर जखमा झालेल्या असून सुदैवाने पुढील अनर्थ टळला. जखमी अवस्थेत शेवंताबाई यांना उपचारासाठी पाचोरा घेऊन गेले असता त्यांना जळगाव येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आले.
मात्र या मजुरांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना बाहेरून लागणारी औषधी व सोबत रहाणाऱ्या व्यक्तीला खर्च लागत असल्याने वनविभागाने यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.