आचार्य बापूसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार समारंभ संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी याठिकाणी पत्रकार दिनानिमित्त शेंदुर्णी तील पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार यांनी केली त्यांनी हा कार्यक्रम सादर करण्या मागचा हेतू स्पष्ट केला व समाजात पत्रकारांची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे याचं महत्व यावेळी स्पष्ट केलं यानंतर कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बांधव डॉ. नीलमकुमार अग्रवाल.
शेखा हमीद भाई.
अतुलजी जहागीरदार,
विलासभाऊ अहिरे,
दीपक जाधव.
योगेश सोनार ,दिग्विजय सूर्यवंशी, या सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित पत्रकारांन पैकी अतुल जहागीरदार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केलं यानंतर संस्थेची सचिव सतीशजी काशीद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर संस्थेचे चेअरमन संजयदादा गरुड यांनी आपले अध्यक्ष भाषण केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारांचे महत्व समाजात व लोकशाहीत किती महत्त्वपूर्ण आहे याबद्दल सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक पी जी पाटील यांनी केले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेचे शिक्षक वृंद कर्मचारी वृंद उपस्थित होते तर आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस सी चौधरी यांनी मानले.