वरखेडी येथिल डॉ. विजय पाटील. यांच्याकडे घरफोडी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील डॉक्टर विजय पाटील. हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून दिनांक २३ मार्च रात्री ते २४ मार्चच्या सकाळपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना आज सकाळी त्यांच्या शेतातील सालदाराच्या लक्षात आल्यानंतर त्याने हि घटना डॉ. विजय पाटील. यांचे मित्र अरुण वाणी यांना सागितली त्यांनी लगेचच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कळवले असता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक निताजी कायटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली
तसेच चोरट्यांनी घरात घुसून घरातील किमती वस्तू मिळवण्यासाठी घरातील सामानाची तसेच कपाटात असलेल्या सामानाची फेकाफेक केल्याचे समजते तसेच डॉ. विजय पाटील. यांनी घराचे सुरक्षिततेसाठी सी.सी.टिव्ही. कॅमेरे बसवलेले होते त्यांची चोरट्यांनी तोडफोड केल्याचे दिसून आले आहे.
मात्र डॉ. विजय पाटील. हे बाहेरगावी असल्याने ते बडोदा येथून सायंकाळपर्यंत पोहचतील व तेव्हाच नेमके काय चोरीला गेले आहे याचा उलगडा होईल.
(सविस्तर बातमी उद्या)