जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील पहिल्या आय. एस. ओ. मानांकन मिळालेल्या दुकानाचे शानदार उद्घाटन संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२३
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पिंपळगाव संचलित शासन मान्य स्वस्त धान्य दुकानास आय. एस. ओ. मानांकन मिळालं असून या स्वस्त धान्य दुकानाचा उद्घाटन सोहळा पाचोरा तालुक्यांचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच पाचोरा तालुक्याचे प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार प्रवीण चव्हाण के व पुरवठा अधिकारी अभिजित येवले यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन, सभासद, सचीव यांना आय. एस. ओ. मानांकन सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. याच वेळी संस्थेची प्रगती पाहून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यालय बांधण्यासाठी बारा लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली माजी आमदार दिलीप वाघ यांनी संस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या व शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करुन संस्थेच्या प्रगतीला हातभार लावला तर अजून संस्था भरभराटीला येईल असे सांगितले, तसेच पाचोराचे प्रांताधिकारी मा. श्री. भूषण अहिरे साहेब व तहसीलदार मा. श्री. प्रविण चव्हाण के यांनी आपल्या भाषणातून सहकार क्षेत्रातील फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर गावातील बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते.
संस्थेचे चेअरमन शालिग्राम मालकर यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची इत्यामभूत माहिती देत लवकरच संस्था स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याचे सांगितले व यापुढेही आमची संस्था सभासदांना सोबत घेऊन कृषी केंद्र व शेतकरी हितासाठी विविध योजना राबवणार असल्याचे सांगितले,
याप्रसंगी मौजूलाल जैन, मिलिंद देव, माजी चेअरमन विठ्ठल गिते, दिलीप जैन, राजू क्षीरसागर, सुरेश बडगुजर, पांडुरंग चोरमले, उपसरपंच सुकदेव गिते सर, व्हाइस चेअरमन अनिस खाटीक, संचालक सुनील क्षीरसागर, जयप्रकाश जैन, राजेंद्र गिते, विजय सावळे, विजय राठोड, जोती राठोड, बालू बडगुजर, जयश्री बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र देव, राहुल बडगुजर, बी. डी. पाटील. सर, सलीम मिस्तरी, गोरख पाटील, संतोष कुठे, बंटी राठोड, शिवदास राठोड, यांचेसह गावातील विविध संस्थाचे प्रतिनिधी, संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भडांगे सर यांनी तर आभार सचिव दीपक पाटील यांनी मानले.
(आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे भाकीत.)
येत्या निवडणुकीत माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ हे खासदार राहतील व मी आमदार राहील असे मत मांडताच सभामंडपात उपस्थितांच्या भुवया उंचावल्या कारण एक दिवसांपूर्वीच अजित दादा पवार हे भाजपा सोबत निघून गेले होते व यात कालावधीत आमदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हे शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत राहतात की अजित दादा पवार यांच्यासोबत राहतात की बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे कारण आमदार किशोर आप्पा पाटील व माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हे जरी विरोधी पक्षात असले तरी त्यांचे पाचोरा तालुक्यासाठी असलेले राजकीय संबंध व समीकरण हे सर्वांनाच ज्ञात असल्याने बहुतेक दिलीप भाऊ वाघ शिंदे गटाशी हात मिळवणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जनमानसातून चर्चीले जात असल्याने पाचोरा तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.