पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या देवेंद्र शिंपीचा शोध सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०९/२०२१
पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृहणापुरी येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात कृष्णापुरी भागातील शिवकॉलनी मधील युवक देवेंद्र धनराज शिंपी वय ४० हा युवक आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे.
दरम्यान स्थानिक नागरिक सदर युवकाचा शोध घेत असून याठिकाणी कर्तव्यावर असलेले नियुक्त पालिकेचे कर्मचारी उपस्थित नसल्याने युवक वाहुन गेल्याची धारणा स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
रात्री पाऊस जास्त असल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी पार करून जाणे अडचणीचे असल्याने सदर युवक रात्री शहरातच नातेवाईकाकडे मुक्कामी थांबला होता. मात्र सकाळी घरी परत येत असताना सकाळी ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. हा युवक सकाळी सुमारे ६.३० च्या सुमारास गावातून घराकडे शिव कॉलनी,कृष्णापुरी कडे येत असताना पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे या युवक पाण्याचया प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
दरम्यान युवकाचे शोध कार्य सुर असून अद्याप पर्यंत प्रशासनातील कोणीत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान परिसरातील जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी होणाऱ्या अशा घटनांमुळे व स्थानिक नागरिकांना व शहरवासीयांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी याठिकाणी सुमारे १८ कोटीं रुपयांचा निधी आणत परिसरातील तीन पुलांचे काम सुरू केले आहे. मात्र या कामास अजून सुमारे वर्षभर कालावधी लागणार असल्याची माहिती आहे.