वाढदिवसाला केक नको..फळे कापा…मुक्ताराम गव्हाणे.
*परप्रांतीय स्वीट मार्ट मालकाऐवजी शेतकऱ्यांना वाचवा*
*माणुसकी समूह व सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था यांचा स्तुत्य उपक्रम.*
वाढदिवस म्हटला की समोर येतो केक. पण आता ५०० ते ६०० रुपयांचा केक न कापता ३० ते ४० रुपयांची फळे कापून वाढदिवस साजरा करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मुक्ताराम पाटील गव्हाणे यांनी केले आहे.आज
माणुसकी समुहाचे सभासद ची राम पंडित यांचा वाढदिवस आज त्यानी स्वता:टरबुज कापुन गोळेगाव येथे साजरा केला.
तसेच माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्ह्याध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी जनतेला आव्हान केले कि केक कापणे महाराष्ट्र बंद करा…आज सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित व सचिव पूजा पंडित यांचे चिरंजीव राम याचा वाढदिवस फळे कापून करण्यात आला. केक कापून परप्रांतीय स्वीट मार्ट मालकांना धड धाकड बनवण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना जगवा. असा शेतकरी हिताचा संदेश दिला. व यापुढे वाढदिवस फळे कापून साजरा केला जाईल. केक कापण्याचा सध्याचा ट्रेंड पाहता केक फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना अगदीच रास्त व अभिनंदनीय आहे. लहान मुलांपासून ते १००वर्षांच्या आजोबांपर्यंत आबालवृद्धांची वाढदिवस थाटात साजरा करण्याची सध्या फॅशन चालू आहे गल्लीबोळात सारी पोरही आपल्या मित्राच्या वाढदिवशी केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत असतात.सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जात असत पण आता मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसा निमित्ताने केक कापणे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. हा केक तीनशे रुपयांपासून ते चार हजारापर्यंत मिळतो केक कापल्यावर २० टक्के केक खायचा आणि बाकीचा सत्कारमूर्ती च्या तोंडाला लावायचा आणि बाकीचा फेकून द्यायचा व केक शरीराला दुष्परिणाम कारक आहेत यात काही प्रमाणात केमिकलचा ही उपयोग केलेला असतो त्यामुळे केक वजा करून आता फळे कापून वाढदिवसाच ओचित्त साधा. यावेळी मुक्ताराम गव्हाणे, सुमित पंडित, लक्ष्मण शींदे, अनिता शींदे, पूजा पंडित, लक्ष्मी पंडित, स्वाभिमानी शेतकरी संघटना सदस्य तसेच माणुसकी रुग्णसेवा समूह सदस्य हजर होते.
———————————–
परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन स्वीट मार्ट ओपन करून प्रचंड नफा कमवितात.एकीकडे परप्रांतीय महाराष्ट्रावर आक्रमण करीत असताना महाराष्ट्रातील शेतकरी मात्र गळफास घेऊन आत्महत्या करीत असल्याचे विदारक सत्य चित्र डोळ्यासमोर आहे. तरी आपला वाढदिवस केक न कापता फळे कापून करा म्हणजे आपला शेतकरी जगेल.. या अगोदर सुद्धा माणुसकी समूह वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आलेले आहेत. वाढदिवस निमित्ताने कधी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, सरकारी हॉस्पिटल येथे बिस्किटे व फळे वाटप करून वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरे केले जातात. त्यामध्ये आता केक न कापता फळे कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे.