वडगाव अंबे वि.का.सोसायटीचा शतकपुर्ती सोहळा संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील वडगाव अंबे येथील विविध कार्यकारी सोसायटी १८ फेब्रुवारी १९२१ रोजी स्थापन करण्यात आली होती. या सहकारी सोसायटीच्या स्थापनेला दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ गुरुवार रोजी शंभरवर्षे पुर्ण होत असल्याने कोरोणाची नियमावली लक्षात घेऊन एका छोटेखानी कार्यक्रमात शतकपुर्ती सोहळा साजरा करण्यात आला.
या शतकपुर्ती सोहळ्याचे सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.नंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सहकार क्षेत्रातील लेखापरीक्षक एस.के.ठाकरे साहेब, जे.डी.सी.बँकेचे बाळासाहेब गरुड, शेखर पाटील या मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थेचे कामकाज सांभाळून संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले म्हणून संस्थेच्या सभासदांनी संस्थेचे चेअरमन हिरासिंग सुरा चव्हाण, व्हाईस चेअरमन अविनाश पंडित निकम, सदस्य मिलींद काशीनाथ भुसारे, संजय धोंडु पाटील, विकास वसंतराव चव्हाण, नाना लोटू पाटील, विनोद राठोड, करण अरुण पवार, सौ.मथुराबाई प्रल्हाद पाटील, मोरसिंग हिरा राठोड, सिंधूताई कडू मराठे, सचिव विनोद सुदाम सोनार, कर्ल्क संतोष आनंद शिंदे यांचा सत्कार केला.
नंतर अँड.मंगेशराव गायकवाड, अरुण पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कामकाजाचा आढावा देऊन संस्थेची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे संस्था टिकवून ठेवली तर आपल्या सभासदांना कर्जासाठी कुणाकडेही जाण्याची गरज रहाणार नाही. त्यासाठी प्रत्येक सभासदाने थकबाकीदार न रहाता घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करुन संस्थेला सहकार्य करावे असे अवाहन केले.
या शतकपुर्ती सोहळ्याच्या निमित्ताने अनिल आबा पाटील, अँड. मंगेशराव गायकवाड, हर्षल पाटील, उत्तमराव राठोड, संजय देवरे, मेहताब राठोड, मुकेश पाटील, मच्छिंद्र थोरात, जोरसिंग चव्हाण, डॉ.शामकांत पाटील,मंगेशराव खैरनार, ज्योयीराम कांबळे, बाजीराव निकम, नामदेव पाटील, तानाजी हटकर, धनंजय राठोड, मंगेशराव खैरनार, कैलास पाटील, गजानन चंद्रे, आबासाहेब शळके, हेमराज राठोड व इतर सदस्य हजर होते
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थीतांना उपहार व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल निकम तर आभार प्रदर्शन मिलिंद भुसारे यांनी केले.