उद्या पाचोरा नगरीत रुबी हॉस्पिटलचा शुभारंभ.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०४/२०२१
उद्या दिनांक ३० एप्रिल शुक्रवारी पाचोरा नगरीत जारगाव चौफुली जवळ नुर शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे रुबी हॉस्पिटल व (क्रिटिकल केअर सेंटर) चा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या शुभ हस्ते व पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. आप्पासाहेब किशोर पाटील. यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.
तरी या उदघाटन प्रसंगी पाचोरा शहर व पंचक्रोशीतील नागरिक तसेच स्नेही मंडळीने सामाजिक अंतर राखत लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन करत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती डॉ. इमरान पिंजारी, डॉ. संतोष पाटील, डॉ. बाबर, डॉ. नासिर देशमुख, डॉ. निहाल सौदागर, डॉ.अदिल शेख, डॉ. अहमद शरीफ देशमुख. यांनी केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.