करगाव येथे भव्य दिव्य संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२१
चाळीसगाव येथून जवळच असलेल्या करगाव येथे मागील पाच वर्षापासून शासनाच्या विविध योजनांचा लाभ माझ्या बंजारा समाजातील प्रत्येक व्यक्तींना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आलो आहे.शासकीय योजनांची जत्रा च्या माध्यमातून घराघरात समाजातील प्रत्येक घटकाला लाभ दिला आहे. यापुढे देखील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. आज मंदिराच्या भूमिपूजनातून बंजारा समाजाला आध्यात्मिक आनंद मिळत असताना माझ्या तरूण बांधवांनी शिक्षणाची कास धरीत निर्व्यसनी राहुन माता पिता याच्या सह समाजाची सेवा करावी. पर्यटन क्षेत्र विकास निधीतून हे मंदिर अधिक भव्य दिव्य करू अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज करगाव येथे दिली.संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी साकारण्यात येणाऱ्या संत सेवालाल महाराजांचे मंदिर भूमिपूजन प्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.