सत्यजित न्यूजची दखल घेत वनविभागाने लोहारी, येथील उपद्रवी माकड पकडले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२१
लोहारी गाव शेतशिवारात एका माकडाने धुमाकूळ घालून काही वाटसरुंना अडवून तर काहींच्या अंगावर धाऊन जात चावा घेत नखांनी ओरबाडून काढले होते.याबाबत लोहारी ग्रामस्थांनी वनविभागाकडे तशी माहिती दिली होती तरीही माकडांचा बंदोबस्त होत नव्हता
म्हणून शेवटी लोहारी ग्रामस्थांनी सत्यजित न्यूजकडे धाव घेतली होती. याची दखल घेत दिनांक १४ फेब्रुवारी रविवारी
{लोहारी गाव व शेत शिवारात माकडांचा धुमाकूळ ग्रामस्थ भयभीत. वनविभाग कुंभकर्ण झोपेत.}
या मथाळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पाचोरा वनविभागाचे वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांनी तातडीने आपले पथक पाठवून दिनांक १५ फेब्रुवारी सोमवारी सकाळी शेतशिवारात पिंजरा लाऊन माकडास जेरबंद केल्याने माकडाच्या उपद्रवापासून भयभीत झालेल्या लोहारी गावपरीसरातील जनतेने वनविभाग व सत्यजित न्यूजचे आभार मानले.
माकडाला पकडण्यासाठी वनपाल नांद्रा सुनिल भिलावे, वनरक्षक नांद्रा- जगदीश ठाकरे, वनरक्षक मालखेड- प्रकाश सूर्यवंशी, वनरक्षक आसनखेडा- ललित पाटील, वनसेवक- श्रावण पाटील.अतिष चांगरे, शैलेश पाटील. हर्षल मिस्तरी, रफिक कहाकर यांनी विशेष परिश्रम घेतले.