महाराष्ट्रातील तरूण समाजसेवक सुमित पंडित व संपूर्ण परिवार कोरोना पॉझिटिव्ह.पहूर रुग्णालयाची कोरोना काळात योग्य उपचारासाठी जळगाव जिल्ह्यात चर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२१
*औरंगाबाद शहरात बेड न मिळाल्याने पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.*
पहूर रुग्णालयाची कोरोना काळात योग्य उपचारासाठी जळगाव जिल्ह्यात चर्चा.
कोरोना काळात अहोरात्र गरीब, हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करणारे महाराष्ट्रातील समाज सेवक सुमित पंडित यांना व त्यांच्या पूर्ण परिवाराला कोरोना रोगाची लागण झाली आहे.
कोविड १९ कालावधीत औरंगाबाद शहरासह इतर ठिकाणी योग्य उपचार मिळवून देण्यासाठी रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या समाजसेवकाला औरंगाबाद व सील्लोड येथे बेड शिल्लक नसल्याने त्यांना थेट जळगाव जिल्ह्यातील पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.
सुमित पंडित यांनी बऱ्याच जणांना मदत केली आहे. लाँकडावुन च्या काळात त्यानी १० क्विंटल जेवन व १,१०,८०० रु रोख रक्कम घराकडे पाई जानाऱ्या गरीब व गरजू लोकांना प्रत्येकी १०० रु प्रमाने वाटप केले होते.
तसेच ५० हजार रुग्णांना झेंडुबाब च्या बाँटल व शासकीय रुग्णालयात हजारो रु औषधी मोफत दिले आहे. शब्दशः त्यांनी कोरोना मुळे मयत झालेल्या हजारो मृतदेहांचे अंत्यविधी सुद्धा केले आहेत.
पाई जाणाऱ्या नागरिकांना जेवण पुरवले, रक्तदान शिबीर घेऊन रक्त पुरवण्याचे कार्य ते करत असतात, मनोरुग्ण यांची कटिंग दाढी आंघोळ करणे,त्यांची पत्नी पूजा पंडित रुग्णांना रोज शासकीय रुग्णालयात जेवणाचे डबे पुरवत असतात, गोरगरीब कुटुंबांना राशन किट वाटप, नुकतेच घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला ४४००० हजार रुपयांची औषधी मेडिकल साहित्य मोफत दिले होते.
रुग्णालयात गरिबांचे सिंघम म्हणून त्यांना ओळखतात. पण आज दुर्दैवाने त्यांचा संपूर्ण परिवारासह पॉसिटीव्ह आले
आहेत. ते अन्य रुग्णांसाठी नेहमी सगळ्या गोष्टी पुरवून देत असत परंतु आता मात्र त्यांना औरंगाबाद मध्ये उपचार करण्यासाठी साधा बेड शिल्लक नाही आहे.परिवाराला सोबत घेऊन फिरत राहिले.
सिल्लोडला रात्रीदेखील कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी जळगाव येथील माणुसकी ग्रुपचे अध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना संपूर्ण हकिकत सांगितली व त्यांना थेट पहूर येथे रात्री बोलावून घेतले.
पहुर ग्रामीण रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र वानखेडे यांनी तत्काळ तपासणी करून सुमित पंडित व त्यांच्या परिवाराला ऍडमिट करून घेतले व त्यांच्या परिवाराला योग्य समुपदेशन करून सहकार्य केले.
डॉ जितेंद्र वानखेडे यांची प्रेमळ वागणूक व योग्य सल्ला याने त्यांचे मनोधर्य मजबूत झाले आहे.
पहूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर जितेंद्र वानखेडे यांनी कोरोना काळात रुग्णांना चांगले करण्यासाठी आपले सर्वस्व झोकून देत अर्ध्या रात्री सुद्धा रुग्णांच्या मदतीला धावून डॉ वानखेडे हे पहुर रुग्णालयात २४ तास सेवा या ठिकाणी देत असून मागील ६ ते ७ महिन्यापासून ते *वन मन आर्मी* प्रमाणे सेवा देत असल्याने ही पहूर गावातील व परिसरातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. सुमित पंडित यांनी डॉक्टर जितेंद्र वानखेडे सर व त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानले.
यावेळी माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, चंद्रकांत गीते, योगेश वाणी, ईश्वर चोरडिया इतर सदस्य उपस्थित होते.