जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ काटे यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामासाठी ६६ लाखांचा निधी, लवकरच होणार कामाला सुरुवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०६/२०२१
गावखेड्यातील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे खेडेगावातील लोकांना अणेक अचणींना सामोरे जावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांनी सतत पाठपुरावा करुन ६६ लाख रुपयांच्या निधी मंजुरी मिळवून घेतली आहे.
या मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये शिंदाड ते गहुले एक किलोमीटर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १९०००००/०० रुपये,
शिंदाड ते निमखेडी दिड किलोमीटर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ३३०००००/०० रुपये.
शिंदाड ते जवखेडी (चिंचपुरा) एक किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १९०००००/०० रुपये,
पिंपळगाव हरेश्वर ते पिंपळगाव हरेश्वर बसस्थानकाकडे जाणारा ७०० मीटर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १२०००००/०० रुपये,
तसेच अंबे वडगाव ते डांभुर्णी ८०० मिटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १४०००००/०० रुपये मंजूर करून घेतले असून लॉकडाऊनच्या कालावधीत काही कारणास्तव अडचणी आल्याने आता लवकरात लवकर ई टेंडर काढून निविदा मागवून कामाला सुरवात होईल असे जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांनी सांगितले.
या रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करुन निधी मिळवून घेत लवकरच रस्ते तयार होऊन आमची दळणवळणाची समस्या सुटणार असल्याचे सांगत शिंदाड, जवखेडी, गहुले, पिंपळगाव हरेश्वर, अंबे वडगाव, डांभुर्णी येथील ग्रामस्थांनी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.मधुकर भाऊ काटे यांचे आभार मानले आहेत.