परराज्यातील कोंबड्यांची पाचोरा तालुक्यात विक्री.
स्वप्नील कुमावत(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२१
सद्या महाराष्ट्रातील काही ठीकाणी कोंबड्या व पक्षांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून या मृत झालेल्या कोंबड्या व पक्षांमध्ये बर्ड फ्लू चार विषाणू आढळून आल्याच्या बातम्या सतत येत असतांनाच बऱ्याच ठिकाणी कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसाईकांवर मोठे संकट आले आहे.
तसेच बऱ्याच ठिकाणी कोंबडीच्या मटण विक्रीवर बंदी घातली गेली आहे.
मात्र याच कालावधीत पाचोरा तालुक्यातील खेडेगावात बाहेर राज्यातून कोंबड्या विक्रीसाठी येत असून हे कोंबडी विक्रेते टेम्पो घेऊन गावागावात फिरत असून एक ते दिड किलो वजनाची कोंबडी फक्त शंभर ते पन्नास रुपयाला विकत असल्याने या बाहेर राज्यातून आलेल्या कोंबड्याची विक्री झपाट्याने होत आहे. आज रोजी वरखेडी , भोकरी येथे मोठ्या प्रमाणात कोंबड्याची विक्री झाली आहे.
याबाबतीत सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून जर का या कोंबड्या बाधित निघाल्या किंवा या बाधित क्षेत्रातील असतील तर आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी ही गंभीर बाब असल्याने या परराज्यातून येणाऱ्या कोंबड्याच्या गाड्या जिल्ह्याबाहेरच हद्दीवरच अडवून त्यांना जिल्ह्यात येण्यासाठी मनाई करावी म्हणजे भविष्यात आपल्या जिल्ह्यात बर्ड फ्लू सारख्या आजाराची लागण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे