औरंगाबाद शहरात आगळीवेगळी मोहीम सुरु, नागरिकांना समाजसेवक सुमित पंडित यांचे शोशल मिडिया द्वारे आवाहन…!
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०१/२०२१
*औरंगाबाद शहरात माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे आगळीवेगळी मोहीम सुरु,आजपासून नगदी (रोकडा) पैसे म्हणून भिक देने बंद करा नागरिकांना आवाहन…!*
वाहतूक सिग्नल असो किंवा रेल्वेस्थानक, बसस्थानक अथवा गर्दीच्या ठिकाणी महिला, पुरुष, वृध्द, अपंग, लहान मुले-मुली भीक मांगतांना आपल्याला दिसत असतील. यामुळे अपघाताचा पण धोका असल्याने वाहतूक पोलिसांनाही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अडचणी येतात. यामुळे माणूसकी समुहाचे समाजसेवक सुमीत पंडित यांनी
आगळीवेगळी मोहीम सुरु करुन भिक मागणा-यांना रोकड दान न करता जेवन, पाणी, कपडे अथवा जीवनावश्यक वस्तू द्यावी असे आवाहन केले आहे. की भीक मागणाऱ्या टोळ्या शहरात सक्रीय झाले आहे. याचेआड गुन्हेगारीला पण आळा बसेल. त्यावर या मोहीमेमुळे आळा बसेल. जो खरा गरजवंत आहे त्यांचेपर्यंत दान पोहचले पाहिजे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. आजपासून रोकड न देता उपयोगी पडणारी वस्तू दान करण्याची मोहीम सुमीत पंडित यांनी सुरु केली आहे.
——————————————-
*भिकाऱ्यांना (अन्न + पाणी) तर देऊ. पण एकही रुपया कॅश देणार नाही.—–माणुसकी रुग्ण सेवा समुह सुमित पंडित*
अशी औरंगाबाद मध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो.आणि ही चळवळ योग्यच आहे.कोणत्याही प्रकारची (महिला /पुरुष / वृद्ध। अपंग/ मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांएवजी (अन्न + पाणी) देऊ, पण आजपासून पैशांची भीक देणार नाही.आपल्या जर खुप वाटलच तर आपल्या बँगमध्ये भीस्किटाचे पुडे ठेवा.
औरंगाबाद शहरातील पोलीसांनी व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यानी या कार्यासाठी आम्हाला मदत करावी हि वीनंती.
*आपल्याला जर काही जीवनावश्यक वस्तू दान करायच्या असतील व आपल्याला वाटत असेल कि खरच गरजवंताला ते भेटेल काय तर आपन माणुसकी रुग्ण सेवा समुहाशी संपर्क करु शकता समाजसेवक सुमित पंडित ७५८८९२८८२२