मंत्रालयाचे वरिष्ठ पत्रकार व ओबीसी नेते अनिल महाजन यांचे भाजपा च्या नेत्यांना खडे बोल एकदम खरमरीत लेख वाचा सविस्तर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक.०७/०५/२०२१
*भाजपवाले सत्तेसाठी फसफस करत आहेत.या भाजप वाल्यांना महाराष्ट्रात सर्वे लोक वेडे दिसतात का ? चीट भी मेरी पट भी मेरी हिम्मत असेल समोरासमोर चर्चेला या – अनिल महाजन*
*लबाड लांडग ढोंग करतय सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थी आंदोलन करतय*
भाजपाच्या हातात केंद्रसरकार आहे. म्हणून उगाच शासकीय यंत्रणांचा गैरवापर करू नका राज्यात तुम्ही जे पेराल तेच उगणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा वाल्यांची नौटंकी बघत आहे. एकीकडे महाराष्ट्र मध्ये कोरोना आजाराने लोक दिवसें दिवस मरत आहे. काही लोक मरणाच्या दारात आहे.त्याच्यांशी यांना काही देणे घेणे नाही. उठ सूट रोज उठून टीव्हीवर येणे, खोटेनाटे आंदोलन करणे हेच भाजप वाल्यांचे उद्योग आहेत. भाजपची सत्ता गेल्यापासून जनहिताचे एक तरी काम तुम्ही केले आहे का ? ते दाखवा पैशाच्या जोरावर काही करत बसू नका. हा *छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे* भाजपची सत्ता असताना प्रत्येक समाजाला तुम्ही उल्लू बनवले मराठा- ओबीसी समाजामध्ये भानगडी लावल्या एकही समाजाच्या संस्थेला निधी दिला नाही.सर्व पैसा भाजप कार्यालयात घातला करोडो रुपयांची कार्यालय थाटले. हजारो कोटी भाजपच्या नेत्यांनी कमावले विदेशात पैसा पाठवला अशा अनेक चर्चा सर्व सामान्यांमध्ये रंगत आहे आणि आपल्या वागण्यावरून ह्या चर्चा खऱ्या दिसत आहेत. *चंद्रकांत दादा पाटील,माननीय देवेंद्र फडणवीसजी,गिरीश महाजन, अतुल भातखळकर आशिष शेलार* अजून जे कोणी असतील ते आपण महाराष्ट्राच्या जनतेला साजेल असे काम करा. उगाच एखाद्या फिल्म मधील व्हिलन सारखे काम करू नका. लोक कोव्हीड महामारीने होरपळून मरत आहे आणि तुम्ही रोज पत्रकार परिषदेत घेत आहेत प्रेस नोट देत आहे. तुमच्या प्रत्येक पत्र प्रेस नोट मी आवर्जून वाचत असतो तुमच्या प्रत्येक प्रेस नोटला उत्तर द्यायचं ठरवलं तर तुम्ही तोंडघशी पडणार तुमच्या प्रश्नांची चिरफाड करायला वेळ लागणार नाही. मी स्वतःभाजप मध्ये चार वर्षे काढलेत आणि भाजप पक्ष कसा चालतो हे मला चांगलं माहीत आहे आणि कोण चालवते हे ही माहित आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तिथे काय स्थान आहे हे माहित आहे. पण हे जास्त दिवस चालत नाही. या देशाने अनेकांना मातीत घातले आहे आणि अनेकांना उभारि दिली आहे. तुम्हाला वाटते आम्हीच खूप हुशार आहेत.बाकी सर्व वेडे आहेत महाराष्ट्रात भाजपाला विरोध करण्यासाठी इतर पक्ष कमी पडत आहेत. नाहीतर तुमची नौटकीला तोड देण्यासाठी त्या तोडीचे नेते नाही किंवा नेते असतील तर ते केंद्र सरकारला घाबरत असतील म्हणून भाजपला उत्तर देऊ शकत नाही.यापैकी काहीतरी नक्की एक आहे कोणी तोंड उघडलं का लगेच त्याच्या मागे *सी.बी.आय, ईडी, इन्कम टॅक्स सर्व प्रकारच्या केंद्रीय यंत्रणा त्यांच्यामागे लावायच्या खोट्या-नाट्या केसेस त्यांच्यावर दाखल करायचे हे सर्व एक दिवस तुमच्यावरच उलटनार आहे*. या सर्व गोष्टी तुमच्यावर उलटायला टाईम लागणार नाही.काय तुमच्या प्रेस नोट आणि काय तुमचे खोटे आंदोलन. तुम्ही आंदोलन कशासाठी करता आहेत. हे पहिलीत जाणाऱ्या मुलाला सुद्धा कळत आहे. चंद्रकांत दादा जर माझा हा लेख आपण वाचत असतील तर थोडी जनाची नाही तर मनाची ठेवा आणि काही तरी आपल्या वागण्यामध्ये सुधारणा करा. रोज उठून एकच स्वप्न बघू नका सरकार पाडण्याच. जनतेसाठी चांगलं काम करा तुम्ही जर चांगले काम केले तर पुढची पाच वर्ष तुम्हीच येणार. उगाच सत्तेच्या घोड्यावर बसण्याची लगीनघाई करू नका. महाराष्ट्रातला भाजपा खरंच नरेंद्र मोदींनी जनतेला दाखवलेल्या विचारातला भाजप आहे का. ?
*या देशातील सर्वांना तुम्ही भिकेला लावले आहे. दैनंदिन गरजेसाठी तुम्ही कधीच आंदोलन करतांना दिसत नाही .आरोग्य,शैक्षणिक,अन्न वस्त्र,निवारा यावर तुम्ही काही बोलत नाही.उलट सर्वांना धमक्या देत आहेत. आणि जातीय तेढ निर्माण करत आहेत महाराष्ट्र काय तुमची प्राहव्हेट लिमिटेड कंपनी समजून ठेवली आहे का?*
राज्य कोविड महामारीच्या संकटात असताना आंदोलन करण्याचे धंदे तुम्ही करत आहात. महाराष्ट्रात कोविड वाढण्याचे सर्वात मोठे कारण हे भाजपा आहे. मंदिरे बंद होती मंदिर उघडण्यासाठी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही आंदोलने केलीत आता मंदिरे पुन्हा बंद करावी लागली. जरा कोविड आटोक्यात आला की लगेच तुम्ही नवीन कुठलातरी मुद्दा घेऊन आंदोलनाला उतरतात. आंदोलन जरूर करा आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे. पण हे आंदोलन जनहिताचा असले पाहिजे स्वार्थी आंदोलनाला महत्त्व नाही. चंद्रकांतदादा घमंड हा रावणाचा सुद्धा राहिले नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या गोष्टीचा घमंड करत आहात हे अजुन महाराष्ट्राच्या जनतेला कळले नाही. वैचारिक स्वरूपाची राज्यहिताची एकही मुलाखत तुमची टीव्हीवर आली नाही. टीका करने या व्यतिरिक्त आपण काही केले नाही. भाजपा पक्षाची नौटंकी बघून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.एक दिवस भाजपाच्या विरोधात सामान्य जनताच रस्त्यावर येईल. भाजपा कधी मुलांच्या शाळेची फी कमी करण्यासाठी आंदोलन करताना दिसली नाही किंवा कधी बँकेच्या व्याजदर कमी करा म्हणून आंदोलन करताना दिसली नाही. किंवा कर्जदारांना दिलासा मिळावा म्हणून एकही काम भाजपाने केले नाही. तुम्ही विरोधी पक्ष म्हणून राज्यात आहात हे मान्य आहे. राज्य सरकारवर अंकुश ठेवणे हा तुमचा अधिकार आहे. परंतु ऊठसूट नको ते आंदोलन करणे व स्वार्थासाठी आंदोलन करणे हे बंद करा जनता दूध खुळी नाही.
*केंद्रसरकार आपले आहे केंद्रात भाजपाचे बहुमत आहे.संपूर्ण हाऊस पार्लमेंटमध्ये जर मराठा आरक्षण बाबत ठराव पास केला असता. तर सुप्रीम कोर्टला मान्य करावे लागले असते. अजूनही वेळ गेली नाही आहे. खरच मराठा समाजाला मनापासून मदत करायची असेल तर आपले केंद्र सरकार करू शकते. पण आपण ते केले नाही कारण आपल्याला माहीत आहे. महाराष्ट्र मध्ये पुन्हा मराठा समाजाला भडकवायचं मराठा तरुण पुन्हा रस्त्यावर येईल आणि ठाकरे सरकारला अडचणीत आणायचं हीच तुमची खेळी आहे. ही सर्वांंना माहीत आहे. भाजप महाराष्ट्र मध्ये सत्तेवर येण्यासाठी किती लोकांचे बळी घेणार आहे कोणास ठाऊक.*
*महाराष्ट्र राज्यात महविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजप वाल्यांनी एकही वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुठलाही विषयावर भेट घेतली नाही. मागील काळात भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा जनतेच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली निवेदन दिले. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत भाजपवाले त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही गेल्या दीड वर्षात एकही वेळा महत्त्वाची समस्या घेऊन भाजपाचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंना भेटायला गेले नाही.*
*उठसूट राज्यपाल महोदय यांची भेट घ्यायला गेले. आतापर्यंतचे राज्यपाल यापैकी सर्वात चर्चेला आलेले राज्यपाल हे कोश्यारी साहेब आहेत. राज्याचा कारभार हे मुख्यमंत्री चालवतात राज्यपाल नाही. एखादा प्रश्न मार्गी लावायचा असल्यास किंवा कुठल्याही समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री हेच पद महत्त्वाचे आहे. हे भाजप च्या नेत्यांना माहीत आहे तरी सुद्धा हे लोक उद्धव ठाकरे यांना भेटायला जात नाही. कारण यांना कमी पणा वाटतो यांची भेट घ्यायला आशा कोविड महामारी मध्ये भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे जाती जाती मध्ये भांडण लावत आहे महाराष्ट्र मध्ये भाजपा च्या नेत्याचे वागणे सुधारले नाहीतर आगामी काळात राज्याची जनता भाजप ला माफ करणार नाही एवढं सांगायच आहे*
*आपला स्नेहांकित*
*अनिल महाजन.*
*चेअरमन :- गर्जा महाराष्ट्र न्यूज समूह.*
*प्रदेशअध्यक्ष:- महाराष्ट्र माळी समाज महासंघ*
*संस्थापक अध्यक्ष :- ए.एम फाउंडेशन*
*मोबाईल नंबर:- 9594754725/9967717171*
*ईमेल आयडी:- anil.maza@gmail.com*
*वेब साईट:- www.anilmahajan.com*