बांभोरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस विधी अधिकारी जागीच ठार तर एक जखमी
दिलीप जैन (पाचोरा)
२०/०१/२०२१
जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बांभोरीजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पोलीस विभागातील विधी अधिकारी हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेला एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
हे दोन्ही जण आज पारोळा येथे कामानिमित्त जात असल्याचे समजते या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली असून जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की जिल्हा पोलिस दलातील विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दुर्गादासगिरी गोसावी राहणार (पाचोरा) आणि शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असलेले संदीप भिकन पाटील राहणार (पोलीस वसाहत जळगाव) हे आज सकाळी दुचाकीने जळगाव येथून कामानिमित्त पारोळ्याकडे जात असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बांभोरी गावा जवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुर्गादासगिरी गोसावी हे जागीच ठार झाले तर संदीप भिकन पाटील हे गंभीर जखमी झाले संदीप पाटील यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दुर्गादासगिरी गोसावी यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा जिल्हा रुग्णालयात गोसावी यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने एकच हंबरडा फोडला
तर दुसरीकडे या घटने बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान दुचाकीला धडक देणाऱ्या वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून त्याचा शोध घेतला जात आहे.
(शेवटचे बातमी हाती आली तेव्हा दुर्गादासगीरी गोसावी यांच्यावर पाचोरा येथे शोकमय वातावरणात अंतीमसंस्कार करण्यात आले यावेळी जळगाव येथील तसे जिल्हाभरातील वकील, पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच तालुका व जिल्हास्तरीय ईतर अधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संखेने उपस्थित होता)