पत्रकार प्रवीण ब्राह्मणे यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून बांधले शिवबंधन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२१
जळगाव जिल्ह्यातील नामांकित न्यूज चॅनेल पीबीसी मातृभूमीचे संपादक तथा लोकसत्ताचे प्रतिनिधी प्रवीण ब्राह्मणे यांनी आज मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील ,पाचोरा विधानसभेचे आ. किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रवीण ब्राह्मणे हे अनेक वर्षा पासून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी गेल्या वेळी २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुक लढवली होती तसेच पाचोरा पिपल्स बँकेची देखील निवडणूक लढवली होती.
सडेतोड, प्रामाणिक, स्पष्ट वक्ते, सामाजिक कार्यकर्ते, अन्यायाला वाचा फोडणारे बेधडक पत्रकार म्हणून ओळख असणारे प्रवीण ब्राह्मणे यांनी लोकमत, सकाळ आदी प्रमुख वृत्तपत्रांसाठी काम केले असून आता ते लोकसत्ता वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत. तसेच पाचोरा शहरातील नामांकित न्यूज चॅनल पीबीसी मातृभूमीचे ते संपादक आहेत.
महाविद्यालयीन वयापासून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून महाविद्यालयीन जीवनापासून आपले नेतृत्वगुण सिद्ध करणाऱ्या मित्रास भावी वाटचालीस शुभेच्छा !