लोहारा येथील माजी उपसरपंच कैलास चौधरी यांना वाचविण्यासाठी पाचोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. धस साहेब यांची धडपड (हेमंत गुरव यांची तक्रार).
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील माजी उपसरपंच कैलास चौधरी हे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वछता समितीचे अध्यक्ष असतांना आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय पैशाची आर्थिक अफरा-तफर केल्याची बाब गावातील नागरिक तथा सरपंच यांचे लक्षात आले वर तत्कालीन सरपंच यांनी त्यांचेवर पिंपळगाव(हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून तरी हेमंत गणेश गुरव यांनी त्यांचेवर ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९/१ नुसार सभासद पद रद्द करणे बाबतची तक्रार मा.विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे केली असता सदरच्या केलेल्या तक्रारीवर चौकशी अधिकारी श्री.धस (विस्तार अधिकारी पंचायत समिति पाचोरा) यांनी सबळ पुरावे असूनही कैलास चौधरी यांना वाचवण्यासाठीचा प्रयत्न करीत आहे व जिल्हा परिषद कडे दिशाभूल करणारे व गोलमाल अहवाल तसेच २०१८ चे जुने अहवाल पाठवून जिल्हा परिषद कार्यालयाची फसवणूक व दिशाभूल करीत आहे तर ही लोकशाही व स्वच्छ सुंदर राष्ट्र निर्मितीला घातक असल्याचा आरोप हेमंत गणेश गुरव केला आहे तरी त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, कैलास चौधरी हे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष असतांना त्यांनी सदारच्या खात्यातील सुमारे १५०००० रु. इतकी रक्कम बे.कायदा गावातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेच्या खात्यात जमा केली= व त्या पतसंस्थेतून परस्पर काढून स्वतःच्या लाभासाठी वापरुण त्या रक्कमेचा अफरा-तफर करून पदाचा दुरुपयोग केला आहे.म्हणून लोहारा येथील उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९/१ नुसार कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार मा.विभागीय आयुक्त यांचेकडे केली असता सदर कार्यवाही होण्यापासून संबंधित व्यक्तीस वाचविण्यासाठी जिल्हा परिषदकडे चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल पाचोरा पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी श्री.धस हे सादर करत असून लोहारा गावात होणाऱ्या भ्रष्ट कामांना पाठबळ देण्याचे काम ते करीत आहे.विस्तार अधिकारी श्री.धस यांची ही धडपड का व कशासाठी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषद कार्यालय जळगाव येथे हेमंत गुरव यांनी केलेल्या तक्रारीची,विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा मूळ विषय घेवून चौकशी न,करता विस्तार अधिकारी धस हे मुद्दाम चुकीच्या पद्धतीने व दिशाभूल करणारे, मूळ विषय सोडून कैलास चौधरी यांना खऱ्या चौकशीमुळे लाभ होईल असे खोटे व मूळ तक्रारीच्या चौकटी बाहेरची गैरलागू मुद्दे असलेला चौकशी अहवाल विस्तार अधिकारी श्री. धस सादर करीत आहेत अशी माहिती हेमंत गुरव यांनी दिली.
विस्तार अधिकारी हे झालेल्या भ्रष्ट व चुकीच्या कामांना पाठीशी घालत आहे,सदर समितीमध्ये झालेल्या (एक लाख पन्नास हजार) रुपये अपहाराचे सर्व कागदोपत्री पुरावे आहेत,तसेच केलेल्या अफरा-तफर प्रकरणी पिंपळगाव (हरे) पोलीस स्टेशनमध्ये देखील गु.र.नं.३३/२०१८ नुसार दिनांक १३/१०/२०१८ रोजी गुन्हा दाखल आहे,तसेच सर्व पुरावे असून देखील संबंधित पंचायत समिती पाचोरा येथील विस्तार अधिकारी यांना राजकीय पुढाऱ्याचा इतका पुळका का कशासाठी अशी चर्चा होत आहे.
संबंधित विस्तार अधिकारी धस यांनी या पूर्वी वरखेडी,वाणेगाव, सातगाव डोंगरी या गावातील गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचार व गैरकारभार या बाबत त्यांच्याकडे तत्कालीन गट विकास अधिकारी श्री.गणेश चौधरी यांनी सोपवलेल्या तक्रारींची संधि प्राथमिक चौकशी देखील केलेली नाही.यामागील श्री.धस यांची अर्थपूर्ण निष्क्रियता समजून येत नाही.तसेच लोहारा ता.पाचोरा येथील बाजार ओटे तोडफोडीचा विषय आहे ते ही भक्कम पुरावे आहेत तसेच उपसरपंच कैलास चौधरी हे स्वतःच्या हाताने प्रोसिडिंग बुक लिहतात त्याचे ही भक्कम पुरावे आहे, असे सर्व असतांना देखील तरी संबंधित विस्तार अधिकारी श्री.धस हे त्यांच्या ठराविक जवळच्या लोकांना वाचविण्यासाठीचा प्रयत्न करीत असतात व त्यामध्ये त्यांचा काय उद्देश असतो हे ह्या सर्व विषयावरून लक्षात येतच आहे विस्तार अधिकारी धस यांनी आमसभेत आमदार किशोरआप्पा पाटील यांचे समोर देखील मान्य केले आहे की तसे पैसे देता येत नाही त्याचा व्हिडीओ पुरावा देखील उपलब्ध असतांना असे जर विस्तार अधिकारी आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या काय आहे हे जर त्यांना माहीत नसतील तर अशा विस्तार अधिकारी यांच्या बदलीची मागणी लोहारा येथील हेमंत गणेश गुरव यांचेकडुन केली जात आहे. तरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जातीने ह्या विषयी लक्ष घालून सदर झालेल्या अफरा-तफराचा योग्य अहवाल मा.विभागीय आयुक्त यांचेकडे पाठविण्याची मागणी हेमंत गणेश गुरव लोहारा यांनी केली असून जिल्हा परिषद यांनी परत फेर अहवाल पंचायत समितीकडे मागितला असल्याची माहिती हेमंत गुरव यांनी दिली आहे.