महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेस आमनेसामने, पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्ण झोपेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२०
आज सायंकाळी लोहारी जवळील इंदिरानगर (वैतागवाडी) जवळ जामनेर ते मालेगाव व सुरत ते जामनेर जाणाऱ्या जामनेर आगाराच्या दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याने बस वाहक, चालक व काही प्रवासी जखमी झाल्ये आहेत.
हा अपघात होताच इंदिरानगर व लोहारीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दवाखान्यात पाठवण्यासाठी खाजगी वाहने तसेच रुग्णवाहिका आणून त्यांना उपचारासाठी पाचोरा पाठवले.
या रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टीवर (पराड्यावर) वाढलेले सात फुटापर्यंतचे गवत थेट डांबरीकरण रस्त्यापर्यंत भिडले असल्याने व तुरळक पाऊस सुरू असल्याने वाहन चालक आपापले वाहन रस्त्याच्या खाली घेऊ शकत नाहीत. कारण या परिसरात साईडपट्ट्याच शिल्लक नाहीत. या कारणांमुळे हा अपघात झाल्याचे दिसून येते.
रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत काढण्यासाठी सत्यजीत न्यूज कडून पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याच्याकडे वारंवार मागणी करुनही पाचोरा ते मालखेडा दरम्यानच्या रस्त्यावर असलेले खड्डे व साईडपट्ट्याची साफसफाई करण्यात आली नाही. या कारणांमुळे या रस्त्यावर दररोज अपघात घडत असून याला सार्वजनिक बांधकाम विभागच कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया देत जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
अपघात झाल्याचे माहीत पडताच स्वप्नील कुमावत रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, मनोज पाटील, शैलेश बागुल यांनी जखमींना तातडीने पाचोरा नगरपालिका दवाखान्यात दाखल केले
दवाखान्यात डॉक्टर अमित सांळुके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करत जखमींना चहापान करून मानसिक आधार दिला.
(आता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्या गलथान कारभाराबाबत आवाज उठवणार)
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे या प्रमाणे
बस चालक (एम. एच. २० बी. एल. ३४७३) सोपान श्रीराम ताठे (वय – ३८) कमरेवर उजव्या बाजुला मार, वाहक मनोहर काशिराम चौधरी (वय – ५५) डोक्याला मार, निर्मला बाबुराव बोदडे (वय – ६०) रा. पहुर कसबे, छातीला मुक्का मार, गुरुदास नाना महाजन (वय – ५२) रा. सुनसगाव ता. जामनेर, छातीला व तोंडाला मार, संजीव रामचंद्र ठाकरे (वय – ५३) रा. जामनेर उजव्या हाताला, पायाला व डोक्याला मार, संध्या दयाराम वांगेकर (वय – ४९) रा. जामनेर चेहऱ्याला मार, यशवंत धर्मा निकम (वय – ५३) रा. चाळीसगाव चेहऱ्यावर व छातीला मार, संभाजी आनंदा पाटील (वय – ३८) रा. बांबरुड महादेवाचे ता. पाचोरा डोक्याला व उजव्या हाताला मार, अविनाश पाटील (वय – २७) रा. पाचोरा छातीला मुक्का मार
ग्रामिण रुग्णालयात जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, डॉ. इमरान शेख, डॉ. पंकज नानकर सह परिचारिका दुर्गा तेली, निता राठोड, परिचारीका अर्जुन पाटील, अमोल भामरे, शैलेश बागुल यांनी उपचारासाठी अथक परिश्रम घेतले.
Re