*जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२०
* जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहळा
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ईश्वर मुळचंद चोरडिया यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा *मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.माणुसकी चा चौथा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी नाव – ईश्वर मुळचंद चोरडिया पत्ता – मु. पो. पाळधी ता. जामनेर जि. जळगाव पद – जे.बी.एन. महाराष्ट्र न्यूज चॅनल कार्यकारी संपादक.
सामाजिक कार्य – रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर आयोजित करून पाळधी, तोंडापुर, चिंचखेडा.
शैक्षणिक कार्य – जयंती तसेच वाढदिवसानिमित्त मुलांना पेन वही चे वाटप, जेवण, आरोग्य शिबिर यांचे आयोजन.
२०१९ मध्ये कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात आलेल्या महापुरात तेथील लोकांना प्रत्यक्ष पने जाऊन संसार उपोयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात प्रत्येक बातमीचे अचूक वार्तांकन तसेच परिसरातील कोरोना बाधित रुग्णाला मदत करीत त्याच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना व्यवस्थित घरी सोडणे.
कोरोना चाचणी व रोगा बाबत जन जागृती अभियान राबवून लोकांच्या मनातील भीती दूर करून टेस्टिंग साठी तयार करणे.
कोरोना योद्धा पुरस्कार – माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव, लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज.
लॉक डाऊन काळात रस्त्याने जाणाऱ्या मजूर, कामगार तसेच वाटसरू लोकांना पाणी, चहा, दूध, बिस्कीट, चिवडा व जेवणाची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी वाहनद्वरे व सरकारच्या निर्देशानुसार परवानगी मिळवून बस द्वारे पोहोच करण्यास मदत करण्यात आली.
कोरोना काळात जामनेर तालुक्यातील प्रत्यक्ष पने 3 कोरोना सेंटरवर जाऊन तेथील कोरोना बाधित व्यक्तीशी संपर्क साधून विचारपूस करून जेवणाची व राहण्याच्या समस्या सोडवून मदत करण्यात आली.
वर्षभरात येणाऱ्या सर्व महापुरुष व देशासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी साजरी करून गावातील मिरवूनिकित भाग घेणे.
अश्या या आदर्श ईश्वर मुळचंद चोरडिया सरांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल ईश्वर मुळचंद चोरडिया यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.