पाचोरा येथील डॉ. स्वप्नील पाटील यांना रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन यू के (इंग्लंड) तर्फे डिग्री आणि अवॉर्ड प्राप्त
दिलीप जैन. ( पाचोरा )
पाचोरा शहरात वैद्यकीय सेवेत वेगवेगळ्या आजाराचे , विकारांचे तज्ञ डॉक्टरांची दिवसागणिक भर पडत आहे. यामुळे जिल्हास्थरावर मिळणारी उपचारपद्धती आता तालुकास्तरावर कमी अंतरावर व कमी वेळेत मिळत असल्याने आर्थिक बचत होत असून जागेवरच कमी वेळात उपचार मिळत असल्याने जिवीतहानी होण्याचे प्रमाणात घट झाली आहे
यातच आता वैद्यकीय क्षेत्रात पाचोरा स्थीत भडगाव रोडवरील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ स्वप्नील प्रल्हादराव पाटील यांना नुकतेच डायबेटीस व किडनी मनेजमेंट साठी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन यू के (इंग्लंड) तर्फे डिग्री आणि अवॉर्ड प्राप्त झाली आहे. ते गेल्या वर्षभरापासून पाचोऱ्यात सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहे अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय डॉ स्वप्नील पाटील यांचे नावलौकिक झाले असून त्यांना डायबेटीस व किडनी मनेजमेंट साठी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन यू के (इंग्लंड) तर्फे डिग्री आणि अवॉर्ड सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्याच्यावर राजकीय व्यवसायिक शासकीय शैक्षणिक पत्रकार डॉक्टर असोसिएशन व विविध सामाजिक संघटना संस्था तर्फे अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.