प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०३/२९२४
संपूर्ण महाराष्ट्रात प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे शहर शेंदुर्णी येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीराम महोत्सवास प्रारंभ होणार आहे. हा श्रीराम महोत्सव म्हणजे
खान्देशातील विख्यात संतकवी आणि भगवंत भक्त वैकुंठवासी
भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वैकुंठवासी गोविंदराव पारळकर यांच्या अथक प्रयत्न व ग्रामस्थांच्या सहकार्याने आजपर्यंत म्हणजे शतकोत्तर परंपरा असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला यावर्षीही गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरुवात होणार आहे.
या प्रभु श्रीराम प्रभुंच्या १०३ व्या जन्मोत्सव निमित्ताने टाळ, मृदंगाच्या गजरात श्रीराम प्रभुंच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे. तदनंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा दिनांक ०९ एप्रिल पासून ते चैत्र शुद्ध अष्टमी दिनांक १६ एप्रिल २०२४ या कालावधीत दररोज रात्री साडेआठ वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार प्रा. डॉ. स्मिताताई अलोणी (नागपूर) यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून या किर्तनाला तबलावादक दिलीप गुरव (धुळे) व हार्मोनियम वादक गोविंदराव मोकाशी पाचोरा यांची संगीतमय साथ मिळणार असल्याने या भक्तीमय कार्यक्रमात विशेष रंगत येणार असून चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे दिनांक १७ एप्रिल २०२४ बुधवार रोजी सकाळी ठिक दहा वाजता प्रभु श्रीराम चंद्राच्या जन्मोत्सवाच्या जीवंत देख्याव्यासह संतश्रेष्ठ श्री. कडोजी महाराज संस्थानचे गादी वारस ह. भ. प. शांताराम महाराज भगत यांचे प्रभु श्रीराम जन्मोत्सवाचे रसाळ किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मोत्सवाचे रसाळ किर्तनानंतर आरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात येऊन रात्री आठ वाजता वाजत, गाजत टाळ, मृदंगाच्या गजरात महिला, पुरुष भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भगवान श्रीराम प्रभुंची पालखी सोहळा काढण्यात येणार असून या श्रीराम जन्मोत्सव व पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या श्रीराम जन्मोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.