भारतीय जनता पक्ष व परीट (धोबी) समाजातर्फे लोहारा येथे, राष्ट्र संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२१
लोहारा येथील भारतीय जनता पक्ष व परीट (धोबी) समाजातर्फे राष्ट्र संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी सुर्वे वाचनालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला व गाडगेबाबा की जय चा जयघोष करीत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. दिपक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कवी मंगलदास मोरे यांनी संत गाडगेबाबांच्या कविता सादर केल्या. अरुण लिंगायत, दीपक पवार, मधुसूदन भंगाळे,गजानन क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा परीट धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत ,परीट धोबी समाज तालुका अध्यक्ष अरुण लिंगायत, सुर्वे वाचनालय अध्यक्ष बापू पाटील, कवी मंगलदास मोरे,सुभाष गिते, सैनिक प्रसाद पवार, जगदीश तेली,चंद्रकांत गिते,मधुसूदन भंगाळे,संजय चौधरी, माणुसकी समूहाचे जिल्हाध्यक्ष गजानन क्षिरसागर, राजू लिंगायत, शाम बागुल,नितीन लिंगायत,अनिल तडवी,नंदू सुर्वे,भास्कर भोई,उमेश देशमुख,विकासो संचालक मनोज देशमुख,नितीन लिंगायत,संजय शेवाळे,माळी समाजाचे अध्यक्ष कृष्णा भिवसने, अतुल कोळी,कैलास लिंगायत, विनोद पाटील, शिवाजी लिंगायत,आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण लिंगायत तर आभार जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत यांनी मानले.