अंबे वडगाव गावाजवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराने पाय गमावले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावाजवळ अंबे वडगाव ते वरखेडी रस्त्यावर पाचोऱ्याकडून येणारा ट्रक क्रमांक यु. पी. ७० एफ. टी. ६४८१ या ट्रक चालकाने अंबे वडगावकडून पाचोऱ्याकडे एम. एच. २० एफ. एल. ३८७० हा क्रमांक असलेल्या दुचाकीवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वाराचे दोघही पाय पुढील टायर खाली आल्यामुळे दोघ पायाचे तुकडे होऊन तो गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात होताच शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. हे करत असतांनाच या संधीचा फायदा घेत ट्रक अपघातस्थळी सोडून ट्रक चालक घटनास्थळावरून पळुन जाण्यासाठी यशस्वी झाला आहे. गावकऱ्यांनी लगेचच १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाऊन अपघात जखमी झालेल्या तरुणास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहे.
या अपघाताची खबर गावातील शशीकांत वाघ, अंकुश पाटील, महेंद्र काळे, भुषण मराठे, सागर शिंदे व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णवाहिकेतून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. या अपघाताची खबर पोलीस पाटील सौ. रेखाबाई वाघ यांचे पती
दिवाकर वाघ यांनी भ्रमणध्वनीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिली आहे.