शिंदाड येथे तरूणीचा विनयभंग; तरूणावर गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२१
तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरूणी घरात एकटी असतांना गावातील एकाने घरात घुसून तरूणीचा विनयभंग केल्याची प्रकार उघडकीला आला आहे. पिंपळगाव हरेश्वर येथे एकावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिंदाड येथे १९ वर्षीय तरूणी १२ जानेवारी रोजी घरी सायंकाळी ७ वाजता घरात कोणीही नसतांना संशयित आरोपी गजानन माणिक पाटील रा. शिंदाड ता. पाचोरा याने दारूच्या नशेत घरात घुसन पिडीतेचा उजवा हात पकडून अलिंगण दिल्याने मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गजानन पाटील यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय माळी करीत आहे.
(शिंदाड गावात भरवस्तीत, भररस्त्यावर, मराठी मुलांच्या शाळेजवळ, धार्मिकस्थळांजवळ दिवसाढवळ्या दिवसरात्र गावठीदारुची विक्री केली जात असल्याने गावपरीसरात शांतता भंग झाली असून या भरवस्तीत व रहदारीच्या ठीकाणी दारुड्यांचा धिंगाणा सुरु असतो व यातून दररोज लहानमोठी भांडणे व गैरप्रकारांना सामोरे जावे लागत असल्याने महिलांना आपल्या दैनंदिन कामासाठी बाहेर निघतांना जिव मुठीत घेऊन जावे लागते तसेच घराबाहेर निघणे मुश्कील झाले असल्याचे महिला सांगतात.
या गावातील दारुबंदीसाठी बऱ्याचवेळा अर्जफाटे व.आंदोलने झालीत तसेच पोलीस प्रशासनाने तसे प्रयत्नही केलेत परंतु गावातील दुफळीचे राजकारण येथील दारुविक्रेते यांच्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे चित्र समोर येते. तरी त्वरित कडक कारवाई होऊन या गावातील गावठीदारुची निर्मिती व विक्री थांबण्याची ग्रामस्थ व महीलांची एकमुखी मागणी आहे.)