पोलीस निरीक्षक किरण शिंदेच्या धडक कारवाईने, महिलांच्या सुखी संसाऱ्याच्या आशा पल्लवीत.
दिलीप जैन.(जामनेर)
दिनांक~०४/१०/२०२१
आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असून, अवैध धंदे वाढण्यामागचे कारण म्हणजे काही (तथाकथित) प्रतिष्ठित, राजकारणी व लोकप्रतिनिधी या अवैध धंदे करणारा यांची पाठराखण करत असल्याची चर्चा जनमानसातून ऐकावयास मिळते. व याच कारणामुळे पोलीस व दारूबंदी अधिकाऱ्यांना कारवाई करतांना अडथळे निर्माण होतात.असे दिसून येते.
परंतु तरीही कर्तव्यदक्ष व आपल्या तत्त्वांशी निष्ठावंत असलेले अधिकारी व कर्मचारी या अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करणे आपले आद्य कर्तव्य समजून कारवाई करत असतात. अशीच कारवाई काल जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केल्याने जामनेर तालुक्यातील सट्टा, पत्ता, दारू हे अवैध धंदे करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून या कारवाईने सुज्ञ नागरिक व व्यसनाधीन असलेल्या व्यक्तींच्या त्रासला वैतागलेल्या महिला वर्गाने किरण शिंदे यांचे अभिनंदन केले असून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाल्यास आमचा संसार नक्कीच सुखाचा होईल असे मत व्यसनाधीतेच्या आहारी गेलेल्या कुटुंबातील पिडीत महिलांनी बोलून दाखवल्या आहेत.
जामनेर हे तालुक्याचे शहर असून याचा भौगोलिक विस्तार खुप मोठा आहे. पोलीस निरीक्षक मा.श्री. किरण शिंदे साहेब यांनी जामनेर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारत लगेचच जामनेर शहर व ग्रामीण भागाचा दौरा करत आपल्या सहकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली असता जामनेर शहरासह तालुक्यातील बऱ्याचशा गावात सट्टा,पत्ता, जुगार व गावठी दारुचे अड्डे सुरु असल्याचे निदर्शनास आले. म्हणून या अवैधधंद्यांचे विरोधात वॉश आऊट मोहीम राबवण्याचे ठरवून शिस्तबद्ध पध्दतीने अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.
पोलीस अधिक्षक मा.श्री. प्रविणजी मुंढे यांच्या आदेशाने केलेल्या या कारवाई मध्ये अपर पोलीस अधिक्षक मा.श्री. रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री. भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. किरण शिंदे सहाय्यक फौजदार संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश कुमावत, सुनिल राठोड, पोना रामदास कुंभार पो.कॉ. तुषार पाटील, निलेश घुगे यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केलेली आहे.
या महिनाभराच्या कारवाईत त्यांनी गावठी दारू विक्री करणाऱ्या व गावठी दारू रसायन बनवणाऱ्या पाच ते सहा मोठ्या कारवाया करून यांच्या मुसक्या आवळल्या.त्याचप्रमाणे बनावट आयडि रॅकेट जेरबंद केले. अवैध रीत्या बायोडिझेल विक्री करणारांवर मोठि कारवाई करून महसूल लाटणाऱ्या चालकांच्या मुसक्या आवळल्या.भुसावल येथून अवैधरित्या ताडी आणून जामनेर तालुक्यात विक्री करणाऱ्याला जेरबंद केले.
वरील कारवायांचा तपास सुरु असतानाच जामनेर तालुक्यातील गाडेगांव शिवारात अवैध रीत्या गावठी दारूचे रसायन गाळत असणाऱ्या अड्डा चालकाला व ज्या व्यक्तीच्या शेतात हा गोरखधंदा चालु होता त्याच्यावर गुन्हा दाखल करून जामनेर तालुक्यातील आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली.
या कारवाईत तळेगाव येथील जितेंद्र नथु कोळी यांची गावठी दारू भट्टी उध्वस्त करून ५०००/- रुपये किंमतीची ७० लिटर गावठी हातभट्टीची दारू १५०००/- रुपये किंमतीची एक बजाज प्लॉटीना मोटर सायकल तर प्रकाश वसंत कोळी रा. तळेगाव याकडून ५००)/- रुपये किंमतीची ७० लिटर गावठी हातभट्टीची दारु १००००/- रुपये किंमतीची एक हिरो होन्डापेंशन मोटर सायकल मद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील शिवारातील एका शेतात सर्वात मोठा गावठी दारू निर्मीतीचा अड्डा उध्दव करत गाडेगांव शिवारात गावठी दारू भट्टी रसायन बनवणार्या भट्टीवर कारवाई केली येवढ्यावरच न थांबता प्रथमच ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा गावठी दारू निर्मीतीचा अड्डा होता त्याच्यावरही कारवाई केल्याने या कारवाईचा अवैधधंद्यांची पाठराखण करणारांचे धाबे दणाणले आहे.
गाडेगांव येथील कारवाईत एकूण चार आरोपी असुन आत्माराम उर्फ जितेंद्र तुळशिराम पवार ,सुनिल सांडु सोनवणे
,अर्जुन शालीक जाधव व शेत मालक , उमांकात मधुकर वराडे हे सर्व रा. गाडेगाव येथील आहे.यांच्या कडून ४५००/- रुपये किंमतीचे २०० लिटर एक लोखंडी पत्री ड्रम १५० लिटर उकळते रसायन, एकुण १,०४,०००/- किमतीचे, १३ प्लॉस्टीक ड्रम २०० लिटर मापाचे त्यात एकुण २६०० लिटर गावठि दारू हातभट्टि ४४००/-किंमतीच्या दोन प्लॉस्टीककॅन एक कॅन ३५ लिटर व दुसरी 20 लिटर मापाची कॅन यात गावठी हात भट्टी दारू चे तयार रसायने भरलेले एकुण ५५ लिटर १,००,०००/- रुपये किंमतीची एक होन्डा कंपनीची युनिकॉन नावाची मोटर सायकल एकुण २,४७,९००/- किंमतीचा मुद्देमाल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस निरीक्षक मा.श्री.किरण शिंदे यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार मा.श्री. संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश कुमावत, सुनिल राठोड, पोलीस नाईक रामदास कुंभार पोलीस कॉन्स्टेबल तुषार पाटील, निलेश घुगे यांना सोबत घेत ही मोठी कारवाई केली.