वाळवंटात चरणारे धरणगावचे नायब तहसीलदार व कोतवाल लाचलुचपत विभागाच्या कोंडवाड्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२३
सद्यस्थितीत खाऊन, पिऊन ढेकर दिल्यावरही असंतुष्ट असलेले काही अधिकारी व कर्मचारी हे आपल्या पदाचा गैरवापर करत हप्ते खोरीच्या मागे लागले असल्याकारणाने जिल्हात सट्टा, पत्ता, जुगारासह अवैध दारु व गांजाच्या अवैध धंदयासह अवैध वृक्षतोड तसेच वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच हि हप्ते खोरी थांबावी म्हणून काही सुज्ञ नागरिक यांच्या विरोधात उतरले असून जळगाव जिल्ह्यात मागील महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अश्या हप्ते खोरांना घरचा रस्ता दाखवला आहे.
मात्र तरीसुद्धा लाच घेणे व लाच देण्याचा प्रकार थांबता, थांबत नसून आज धरणगावचे नायब तहसीलदार जयवंत पुंडलिक भट व कोतवाल राहुल नवल शिरोडे हे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून कारवाईचा बडगा दाखवून कारवाई न करता कारवाई थांबवून शासनाची कोणत्याही परवानगी न घेता परस्पर वाळू वाहतुक सुरु ठेवण्यासाठीघ्या बोलीवर तडजोड करण्यासाठी ३००००/०० रुपयांची मागणी केली होती.
परंतु संबंधित डंपर मालकाने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मा. श्री. शशिकांत पाटील यांनी सापळा रचून धरणगावचे नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट व कोतवाल राहुल नवल शिरोडे यांना तडजोडीअंती २५०००/०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील लाचखोरांच्या गटात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मा. श्री. शशिकांत पाटील यांनी केलेल्या कारवाईबाबत अभिनंदन कले जात आहे.