ब्लॅंकेट वाटपातून दिली मायेची ऊब;भाजपा व्यापारी* *आघाडीचा स्तुत्य उपक्रम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१२/२०२१
जळगाव जिल्हा भाजपा व्यापारी आघाडी व कु.प्रांजल कांतीलाल जैन. यांच्या सौजन्याने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म जयंती दिनाचे औचित्य साधत पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन, शिवाजी चौक, जारगाव चौफुली,जामनेर रोड,महाराणा प्रताप चौक,भडगाव रोड आदी परिसरातील गोरगरीब व फुटपाथवर राहत असलेल्या व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
कु. प्रांजल जैन यांच्यातर्फ हे ब्लॅंकेट वितरित करण्यात आले याप्रसंगी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी , रमेश श्यामनानी, राजेश संचेती, रिंकु जैन,नामदेव धोबी, जितू नागराणि, अमित शामणानी, समाधान पाटील आदी उपस्थित होते. सध्याच्या हिवाळ्यात अनेक गोरगरीब नागरिकांना स्वतःचा निवारा नाही कडाक्याच्या थंडीत ते उघड्यावर आपले जीवन कंठीत असतात याची जाणीव ठेऊन आपण स्व.अटलजींच्या जीवनाचा व सेवाभाचाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत भाजपा व्यापारी आघाडी व बानोटीवला परिवाराच्या वतीने सेवाकार्यात अल्पसा सहभाग नोंदवला असल्याची भावना व्यक्त केली आहे.