सावलीचे भूत आणि अफवांना ऊत, दिलीप जैनच्या घरी येत आहेत म्हणे मारेकरी.

दिनांक~११/०६/२०२३
आज दिनांक ११ जून रविवार रोजी सायंकाळी मी अंबे वडगाव येथे घरी बसलो होतो. घरच्यांशी गप्पा करत असतांनाच सायंकाळी सात वाजून सव्वीस मिनीटांची वेळ असतांना अंबे वडगाव गावातील माझा हितचिंतक जिवाभावाच्या नातवाचा फोन आला की बाबा तुम्ही कुठे आहात मी म्हटलं घरी बसलो आहे, सगळ काही ठीकठाक आहे का ? मी हो म्हटलं तरीही समोरुन विचारण्यात आल की काही गडबड आहे का ? तुमच्याकडे काही बाहेरगावाहून लोक आले आहेत का ? तेव्हा मला संशय आला व तु मला आज अस का विचारतोय म्हणून प्रश्न केला सुरवातीला त्याने जाऊद्या हो बाबा असच विचरल परंतु मी थोडा हट्ट धरुन पुन्हा विचारले तेव्हा त्याने सांगितले की मला मला अमक्या, अमक्या गावाहून फोन आला की एका गावावरचे काही लोक दिलीप जैन यांना मारायला येत आहेत. हे ऐकून मी अचंबित झालो जवळच पत्नी व मुले बसलेली असल्याने हा विषय त्यांच्यापर्यंत गेल्यावर ते नहाकच काळजी करतील म्हणून मी फोनवर जास्त बोलन टाळल व तसा काही प्रकार नसल्याचे सांगितले तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनाचे समाधान झाले.
मात्र माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले ही बातमी खरी असेल का ? जर ही बातमी खरी असेल तर आपण अशी कोणती बातमी दिली आहे की त्यामुळे लोक थेट घरापर्यंत मारायला येत आहेत. म्हणून मी मागील आठवड्यात दिलेल्या बातम्यांचा आढावा घेतला मात्र लोक इतके चिडतिल अशी कोणतीही बातमी नसल्याचे दिसून आले व मी पुन्हा घरातील मंडळी सोबत गप्पा मारत बसलो चला जाऊद्या ह्या गोष्टी घडतच असतात याचा चांगलाच अनुभव मला माझ्या चाळीस वर्षांपासून निर्भिडपणे करत पत्रकारितेच्या माध्यमातून आलेला आहे.
चला असो “सर सलामत तो पगडी पचास” मी मागील चाळीस वर्षांत अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अवैध धंदे व इतर समाजविघातक विषयावर रोखठोकपणे पत्रकारिता केली असल्याने काही लबाडांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. तसेच रोखठोक जनहितार्थ पत्रकारिता करतांना आजही बरेचसे लोक नाराज आहेत. म्हणून काही घरचे भेदी व काही आपल्यातलेच अहित चिंतक अश्या घटना घडल्या पाहिजे म्हणून खतपाणी घालत असतात. परंतु माझे पत्रकार बांधव व चांगल्या लोकांचे आशिर्वाद अशा बांडगूळाची इच्छा कदापीही पूर्ण होऊ देणार नाहीत असा माझा विश्वास आहे.