भोकरी येथील घराची भिंत कोसळून जखमी झालेल्या बानोबीचा अखेर मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०९/२०२२

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी येथील बानोबी रशीद कहाकर वय (३८) ही महिला दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी स्वताच्या घरात बसली असतांंना घराची भिंत कोसळून यात बानोबी जबर जखमी झाल्या होत्या हि घटना घडल्यानंतर बानोबी यांना जळगाव येथील डॉ. जगदीश बोरोले यांच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी येथील रशीद कहाकर हे गरीब कुटुंब दिवसभर मंजूरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्याचे रहाण्यासाठीचे घर दगड, विटा व मातीत बाधलेले आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून भोकरी परिसरातील वस्तीत दलदल निर्माण झाली होती. यातच रशीद कहाकर याचे कच्च्या भिंतीचे जुने घर असल्याने पावसाच्या पाण्यात भिंत भिजल्यामुळे ती भिंत दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री बानोबी घरात बसलेल्या असतांनाच कोसळली व यात बानोबी जबर जखमी झाल्या होत्या जखमी झाल्यानंतर त्यांना जळगाव येथील डॉ. जगदीश बोरोले यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु काल दिनांक १० सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी रात्री बानोबी ह्या मृत्यूशी झुंज देत हरल्या व त्यांची प्राणज्योत मालवली ही बातमी भोकरी येथे माहिती पडताच भोकरी, वरखेडी गावातून हळहळ व्यक्त केली जात होती.

ब्रेकिंग बातम्या