व्यसनांपासून दूर रहा, सकारात्मक विचार ठेवा यश नक्कीच मिळते. महेंद्र वाघमारे
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२४
लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वताचा विचारांवर ठाम रहा व सकारात्मक विचार ठेवा नक्कीच यश मिळते असे प्रतिपादन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी शिंदाड येथील तरुणांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन करतांना केले.
महेंद्र वाघमारे पुढे म्हणाले की आपले आईवडील आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करुन शिकवतात याची जाणीव ठेवून चांगल्या मित्रांच्या संगतीत राहून अभ्यासाविषयी चर्चा केली तर नक्कीच ज्ञानात भर पडेल तसेच मोबाईल वाईट वस्तू नाही परंतु त्याचा योग्य वापर केला तर ते योग्य आहे म्हणून मोबाईचा अती वापर धोकादायक असल्याने त्याचा योग्य वापर केला पाहिजे तसेच व्यसनाधीनतेपासून लाब रहा असे सांगून उपस्थित स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला.
महेंद्र वाघमारे यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावातील तरुणांना स्पर्धा परीक्षे विषयावर मार्गदर्शन करुन विविध ठिकाणी अभ्यासिका सुरु करत अभ्यासासाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. या कार्याची दखल घेत तसेच त्यांची नुकतीच त्यांची व उपनिरीक्षक अमोल पवार यांची बदली झाली असल्याने पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकारांनी त्यांचा निरोप समारंभ व सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या सत्कार व निरोप समारंभप्रसंगी संदीप सराफ, उत्तमराव मनगटे, हेमशंकर तिवारी, रविशंकर पांडे, सुनील लोहार, दिलीप जैन, भिकन पाटील, दीपक मुलमुले, राकेश सुतार, गजानन लाधे, विनोद पाटील,भा. ज. पा. अध्यात्मिक विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील यासह तरुण उपस्थित होते.