डॉ. मुकुंद सावनेरकर यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा, किशोर रायसाकडा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०१/२०२४
पाचोरा शहरातील नामांकित सावनेरकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुकुंद सावनेरकर यांना दिनांक १८ डिसेंबर २०२३ सोमवार रोजी भागवत रुपचंद पाटील व इतर सात अनोळखी इसमांनी दवाखान्यात अनाधिकृतपणे प्रवेश करत डॉ. मुकुंद सावनेरकर यांना जबर मारहाण केली होती. या घटनेबाबत डॉ. मुकुंद सावनेरकर यांनी भागवत पाटील व अन्य सात अनोळखी इसमानविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर नोंदवला आहे.
परंतु आज १८ जानेवारी २०२४ गुरुवार उजाडला असून ही घटना घडून तब्बल एक महिना उलटला तरीही डॉ. मुकुंद सावनेरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांना अद्यापही अटक झाली नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातून याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांच्या नेतृत्वाखाली नंदकुमार शेलकर, अनिल आबा येवले, प्रमोद सोनवणे, अबरार मिर्झा, भुवनेश दुसाने, सुरेंद्र मोरे, सुनील कोळी, शेखर पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन देऊन हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.