पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केली मोबाईल चोरट्यांना अटक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२३
कोल्हे येथील बेबीबाई तडवी यांच्या घरातून दिनांक ०७ जानेवारी २०२३ शनिवार ते १० जानेवारी २०२३ मंगळवार दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईल चोरुन नेल्याचे लक्षात आल्यानंतर या चोरी बाबत दिनांक ११ जानेवारी २०२३ बुधवार रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ८/२०२३ भा. द. वि. कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस कसून तपास करीत होते.
या तपासाअंती मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित आरोपी रोशनबाई तडवी हिस चोरीला गेलेल्या तीन मोबाईल सह अटक करण्यात आली असून संबंधित गुन्ह्यातील आरोपी रोशनबाई तडवी यांच्याकडून चोरीला गेलेले तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
या गुन्ह्यांच्या तपासासाठी अधीक्षक मा. श्री. एम. राजकुमार साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. रमेश चोपडे साहेब, उपविभागीय अधिकारी मा. श्री. भारत काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे, उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस नाईक पांडुरंग गोरबंजारा, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित निकम यांनी अथक परिश्रम घेतले.
पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी सावखेडा येथील शेतात लावलेला लाखो रुपयांचा गांजा तसेच डोंगरी सातगाव व लोहारा येथील कापूस चोरांना पकडून त्वरित कारवाई केली. तसेच अवैध धंद्यांवर धाडसूत्र सुरू केले असल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या या कामगिरी बाबत पंचक्रोशीतून समाधान व्यक्त केले जात आहे.