जामनेरच्या भोंदु महाराजने लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत दुसखेडा येथील नवरदेवाची केली फसवणूक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२१
आज धावपळीच्या युगात हम दो हमारे दो हे तत्त्व बाळगून सगळीकडे मुलगी नको अशा समजुतीने समाजात काही घटक विविध उपाययोजना करून मुली होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. परंतु दुसरीकडे प्रत्येक समाजात मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचे दुष्परिणाम म्हणून आपला मुलगा उपवर झाल्यावर त्याचे लग्न कसे होईल या विवंचनेत त्या मुलाचे आई वडील असतात. मग आपल्या मुलाला मुलगी मिळत नाही म्हणून आई वडील शोधाशोध करून अनेक मार्गाने मुलगी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात.
यातच आता लग्न जमून देणे म्हणजेच सोयरीक संबंध करून देणे यासाठी मोठ्या प्रमाणात सगळीकडे दलाल तयार झाले आहेत. व काहींनी याचा गुराढोरांप्रमाणे दलालीचा धंदाच सुरु केला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मग गरजवंताला अक्कल थोडी व आपल्या मुलाचे लग्न योग्य वयातच झाले पाहिजे म्हणून मुलीची शोधाशोध करण्यासाठी जो मिळेल त्याच्याकडून आपल्या मुलासाठी योग्य मुलगी शोधण्याचा कार्यक्रम सुरू होतो. व यातूनच भल्याभल्यांची फसवणूक होत असते. याचे एक जिवंत उदाहरण म्हणून पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील नवरदेवाची लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरी मुलगी आलीच नाही म्हणून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की. जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजराचे या गावातील दाढी वाढवत स्वताला महाराज म्हणवून घेणारा संशयित आरोपी राजेश्वर नारायण पाटील हा लग्न जमविण्याचे काम करतो. म्हणून त्याची चर्चा आहे. व तो व्हाट्सएपच्या माध्यमातून गरजू लोकांशी संपर्क साधतो अश्याच प्रकारे या लबाड बाबाने पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील यांना व्हाट्सअप वरून एका मुलीचा फोटो पाठवत तुला ही मुलगी पंसद असेल तर तुझा विवाह या मुलीशी लावुन देतो असे सांगत नवरदेव मुला कडुन तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये रोख मुलीचे दागिने आणि अजुन एका मध्यस्थीला देण्यासाठी घेऊन लग्नाच्या दिवशी नवरी घेऊन येतो असे आरोपीने विश्वासाने सांगितले होते.
समोरचा व्यक्ती दाढी वाढवलेला स्वयंघोषित बाबा असल्याने मुलाकडील मंडळीचा विश्वास बसला व लगेचच दुसखेडा येथे दिनांक २२ जुन मंगळवार २०२१ रोजी चि. रविंद्रच्या विवाह सोहळाचे आयोजन करण्यात आले. ठरल्या प्रमाणे विधीवत नवरदेवाला हळद लावली गेली. दुसऱ्या दिवशी लग्न लावण्यासाठी नवरी केव्हा येईल ही माहिती घेण्यासाठी लग्न जमविणाऱ्या मध्यस्थी बाबाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधला मात्र बहाद्दरचा मोबाइल स्विचअॉफ असल्याने वारंवार फोन करुनही संपर्क होत नसल्याने. रामभरोसे नवरीची वाट बघुन बघून वराकडील मंडळी व वऱ्हाडी यांची सहनशीलता संपल्यावर अधिक तपासाअंती आपली फसवणूक झाल्याचे संबंधितांचे लक्षात आले.
ही बाब लक्षात आल्यानंतर काही दिवस बाबांची शोधाशोध केली केल्यानंतर आपली नक्कीच फसवणूक झाली आहे म्हणून मुलाकडील मंडळीने सरळ पाचोरा पोलिस स्टेशन गातठ फसवेगिरी करणाऱ्या राजेश्वर विरुद्ध रितसर तक्रार दिल्यावरुन फसवेगिरी खरणाऱ्या राजेश्वर विरोधात भादवी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.
जामनेर तालुक्यातील त्याचे मुळ गावी जाऊन अधिक माहिती घेतली असता राजेश्वर नारायण पाटील हा या परिसरात मोबाईल वरुन संपर्क साधून व्हाट्सएप व फेसबुकवर असलेल्या मुलींचे फोटो व्हाट्सएपच्या माध्यमातून गरजूंना पाठवून लग्न जमवून देण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक करत असतो तसेच अंधश्रद्धा वाढीस लागेल असे धागा, दोरा, करणी, कवटाळ, भूतबाधा, गुप्तधन शोधून देण्यासाठीच्या बतावण्या करत असल्याचे समजते.